Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayअकोल्यात शिंदे गटाच्या भावना गवळी आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत आमने-सामने आले...

अकोल्यात शिंदे गटाच्या भावना गवळी आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत आमने-सामने आले तेव्हा काय घडलं?…पहा Video

अकोला : राज्यात शिंदे गटाचे आमदार, खासदार दिसताच क्षणी सर्वसामान्याच्या मनात ५० खोके हा विषय येतोच, का म्हटले जाते हे पण आता जनतेला सर्वश्रुत आहे. तर काल अकोल्यात शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत काल आमने-सामने आले आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी दिसताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केल्यात.

काल विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली. यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते. यादरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

तसेच रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिले. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सौजन्य – सोशल मीडिया
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: