Friday, May 10, 2024
HomeMarathi News TodayViral Video | बाई आपल्या मुलाला घेऊन मृत्यूला कवटाळणार होती…तेवढ्यात अचानक देवदूत...

Viral Video | बाई आपल्या मुलाला घेऊन मृत्यूला कवटाळणार होती…तेवढ्यात अचानक देवदूत बनून आला बस ड्रायव्हर…

Share

Viral Video : सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात तर काही खरोखर हृद्याला भिडणारे तर काही कौतुक करणारे असतात. तर आत असाच एका देवदूताचा व्हिडिओ समोर आला आहे जो एका लहान लेकराला व त्याच्या आईला जीवन देणारा. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याचे लोक खुलेआम कौतुक करत आहेत. काय झाले हे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एका महिलेने आपल्या मुलाला सोबत घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु ती वाचली. त्याचे असे झाले की, रस्त्यावरून रडत चालत असलेल्या एका महिलेने अचानक आपल्या मुलाला कडेवर घेऊन पुलाखालील पाण्यात उडी मारायला सुरुवात केली आणि तेथून जाणाऱ्या बसच्या चालकाच्या नजरेस पडली. यानंतर, तो एक देवदूत बनतो आणि विजेच्या वेगाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना पकडतो.

दोन दिवसांत 5 दशलक्ष लोकांनी हा प्रशंसनीय व्हिडिओ पाहिला
वास्तविक, 18 डिसेंबर रोजी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द बेस्ट नावाच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून एवढा पसंती मिळत आहे की, दोन दिवसांत याला जवळपास 5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अवघ्या 18 सेकंदात दोन जीव वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत खरोखरच पाहण्यासारखी आहे. तसेच, ते पुढे शेअर करून त्यावर कमेंट करण्याची युजर्समध्ये स्पर्धा सुरू आहे. ही घटना कधी आणि कुठे घडली हे समजू शकले नसले तरी जीव वाचवून त्यांना बसमध्ये बसवणाऱ्या चालकाच्या कौतुक होत आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: