Wednesday, May 1, 2024
HomeMarathi News Todayड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर काच फोडून शोरूममध्ये घुसला...व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!!!.....

ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर काच फोडून शोरूममध्ये घुसला…व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क!!!…..

Share

ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर स्वतःच सुरू होतो. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बिजनौरचे आहे. जिथे चपलांच्या दुकानाबाहेर एक ट्रॅक्टर उभा होता. अचानक काय झालं की स्वतःहून ट्रॅक्टर सुरु झाला आणि पुढे जावू लागला. ते पाहून लोक थक्क झाले. मात्र, त्यांनी ट्रॅक्टर थांबवण्यापूर्वीच ट्रॅक्टर शोरूमची काच फोडून, ​​दुचाकी व सायकल तुडवून आत घुसला. या तुटलेल्या काचेची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या 1 मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चपलांच्या शोरूमच्या बाहेर ट्रॅक्टर उभा असल्याचे दिसून येते. अचानक तो स्वतः चालू होतो आणि काच फोडत शोरूममध्ये प्रवेश करतो. एक माणूस ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण तो अपयशी ठरतो. नंतर, एक माणूस ट्रॅक्टरचे ब्रेक लावतो ज्यामुळे तो थांबतो. पण त्याचे इंजिन थांबत नव्हते. अशा स्थितीत लोक ट्रॅक्टर थांबवण्यासाठी त्याची तार कापतात. मात्र ट्रॅक्टर थांबायचे नावच घेत नव्हते, व्हिडीओमध्ये लोक या ग्लासची किंमत 80 हजार असल्याचे सांगतांना ऐकू येत आहे. जी दुचाकी ट्रॅक्टर खाली आली, ती दुरुस्त करण्यासाठी सुमारे 8-10 हजार रुपये खर्च होतील. ट्रॅक्टर स्वतःहून कसा धावू लागला हा मोठा प्रश्न आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शेअर केला जात आहे. हे झुबेर अख्तर (@Zuber_Akhtar1) यांनी ट्विटरवर शेअर केले आणि लिहिले – आश्चर्यकारक घटना.. ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर धावला, काचा फोडून चपलांच्या शोरूममध्ये प्रवेश केला. व्हायरल झालेला सीसीटीव्ही व्हिडिओ #UP च्या #बिजनौरचा आहे. जिथे पोलिस ठाण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बाहेर उभा असलेला ट्रॅक्टर स्वतःहून सुरू करून एका शोरूममध्ये घुसला. या क्लिपला आतापर्यंत शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, मला वाटते की हा ट्रॅक्टर रिमोटने नियंत्रित केला जात आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: