Thursday, May 9, 2024
Homeराज्यमालेगांव येथे सकल जैन समजाच्या वतीने संत शिरोमणी आचार्य विद्यासागर जी महाराज...

मालेगांव येथे सकल जैन समजाच्या वतीने संत शिरोमणी आचार्य विद्यासागर जी महाराज यानां विनयंजली अर्पण..!

Share

मालेगांव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव येथील सकल जैन समाजाच्या वतीने विश्वनंदनीय आचार्य गुरुदेव श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांना सामूहिक विनायंजली अर्पण करण्यात आली जैन दिगंबर मुनी परंपरेचे आचार्य मुनि श्री विद्यासागर जी महाराज यांनी दि.१७ फेब्रुवारी रोज शनिवारी मध्यरात्री २.३५ ला छत्तीसगड मधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे देहत्याग केला.

शुक्रवार रोजी दुपारनंतर मुनिश्री नी बुद्धी पूर्वक जागृत अवस्थेमध्ये सलेखना धारण केली त्यांनी आचार्य पदाचा त्याग करून तीन दिवस उपवास धारण केले आणि मौन धारण केले समतापूर्वक समाधी धारण केली मालेगांव येथे सकल जैन समाज वतीने आचार्य श्रींच्या दुःखद निधनाची बातमी समजताच सर्व वाशीम जिल्ह्यातील समाजामध्ये शोक पसरला त्यानंतर समाजाने दिवसभर बंद हि पाळला आपले व्यवसाय सर्व बंद ठेवून आचार्य श्रींना विनायांजली वाहिली तसेच दि.२५ फेब्रुवारी रविवार ला श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन येथे समाजातील सर्वांनी एकत्र येऊन 108 नमोकार मंत्र जाप पठण केले.

तसेच आरती व आचार्य गुरुदेव महाराजांबद्दल विचार मांडले यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तथा समस्त जैन बांधव यांनी आचार्य श्रींच्या दर्शनास ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मालेगांवचे श्रावक घेऊन जात असत गेल्याच वर्षी मंदिर स्थापनेच्या कार्यक्रमाच्या आधी जाऊन आचार्य श्रींचा आशीर्वाद ही मालेगांवचे श्रावक श्राविका जवळपास बहुसंख्येने जाऊन आचार्य श्रींना भेटून आशीर्वाद घेतले होते.

अशा विविध आठवणी या ठिकाणी आज सांगण्यात आल्या तसेच विशेष म्हणजे 24 डिसेंबर 2022 ला मालेगाव येथे आचार्य श्री चा विश्राम झाला ते सर्वात मोठे समाज वाशी यांचे भाग्य लाभले त्यानिमित्ताने समाजवासीयांनी असेही म्हटले की आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना ही लवकरात लवकर करण्यात येणार असे बोलण्यात आले.

महाराज महाराष्ट्रात यावे अशी सर्वांची भावना होती परंतु याचा काही योग आला नाही तसेच आचार्य श्री च्या पायगुणाने जैनाची काशी असलेले शिरपूर जैन येथे विविध उपक्रम यांचा पाया घालून दिला आहे प्रामुख्याने सांगायचे झाले तर मुलींच्या साठी प्रतिभा स्थली सुंदर अशी शाळा निर्माण केली आहे.

त्याचबरोबर सर्वांना हाताला काम मिळावे म्हणून हातकरगा वस्त्रनिर्मिती केली आहे तसेच आरोग्यासाठी पूर्णयु च्या माध्यमातून सर्व आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली आहे व यावेळी सौ. ज्योती प्रफुल टिकाईत यांनीही आपले विचार मांडले त्या म्हणाल्या की विविध उपक्रमांचा पाया आचार्य श्रींनी घालून दिला आहे.

आता सर्व श्रावक व श्राविकांची जबाबदारी आहे की दिलेल्या मार्गाने आपण ही सेवा सातत्याने कार्यरत चालू ठेवावी. त्यांना संस्कृत सहित हिंदी मराठी कन्नड इंग्रजी विशेष ज्ञान होते त्यांनी विविध भाषेमध्ये रचना केली आहे.

यावर १०० पेक्षा जास्त प्राध्यापकांनी मास्टर ऑफ डायरेक्ट यासाठी अध्ययन केले आहे त्यांच्या जाण्याने जैन धर्मा सहित पूर्ण भारतवासीयांची हानी आहे समस्त सकल जैन समाज च्या अनुयायांच्या साक्षीने त्यांना विनयांजली अर्पण करण्यात आली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: