Friday, May 24, 2024
Homeगुन्हेगारीलग्नातील वरतीवर काळाची झडप, वऱ्हाड्यातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी...

लग्नातील वरतीवर काळाची झडप, वऱ्हाड्यातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी…

नरखेड (दि १०) – बेनोडा येथील वरात सावरगावला लग्नाला आली होती. लग्न समारंभ उरकल्यानंतर त्यातील काही वऱ्हाडी परतीचा प्रवास करीत होते त्या दरम्यान ४.१५ वाजता नरखेड पोलीस स्टेशन हद्दीत सावरगाव – नरखेड मार्गावर टोळापर शिवारात पिंपळगाव वखाजी धरणाच्या बायपास जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मारुती सुझुकीने मोटार सायकल स्वारास जोरदार धडक दिली त्यात घटना स्थळी एकाच मृत्यू तर नागपूर येथे उपचारादरम्यान दुसऱ्याचा मृत्यू झाला. तिसरी अतिशय गंभीर जखमी असून तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे.

रुपराव खांडेकर वय ५५ रा बेनोडा त वरुड जि अमरावती
जनार्धन डोंगरे वय ६० रा पुसला ता वरुड जि अमरावती,
ममता जनार्धन डोंगरे वय ४२ रा पुसला ता वरुड जि अमरावती हे सावरगाव येथील त्याचा भाचा सुरेंद्र रामराव पाटील याच्या लग्नाकारिता आले होते. मोटर सायकल क्र एम एच २७ बीजे ३५७४ या गाडीने ट्रिपल सीट सावरगावचे लग्न कार्य संपवून गावाकडे निघाले होते.टोळापर शिवारात पिंपळगाव वखाजी धरणाच्या बायपास जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या मारुती सुझुकी गाडी क्र एम एच ४९ ए ई ६४२६ ने जब्बर धडक दिली. त्यामुळे मोटार सायकल चकणाचूर झाली असून रुपराव खांडेकर याचा जागीच मृत्यू झाला.जनार्धन डोंगरे यास नागपूरला उपचारासाठी हलविल्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला.ममता जनार्धन डोंगरे ही मृत्यूशी झुंज देतं आहे.

नरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत्यू देह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय नरखेड येथे पाठविण्यात आले.
मारोती सुझुकी गाडी चालक नरेंद्र नामदेव अलोणे, वय ४५ रा खैरगांव ता नरखेड जि नागपूर व सह प्रवाशी समीक्षा किशोर अलोणे हेही जखमी झाल्यामुळे गाडी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments