Homeराज्यहिंगणा तालुक्यातील सुकळी घारापुरे येथे वादळाने अनेक कुटुंबांचे नुकसान…

हिंगणा तालुक्यातील सुकळी घारापुरे येथे वादळाने अनेक कुटुंबांचे नुकसान…

Share

जि प. सदस्य दिनेश बंग यांनी केली पाहणी….

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -हिंगणा तालुक्यातील रायपूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या सुकळी घारापुरे येथे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले.

वादळाची तीव्रता एवढी होती की त्यात रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल, झाडे, रस्त्यावर कोसडून पडली. तर अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उध्वस्त झाल्या, भाजीपाला पीक जमीनदोस्त झाले, वीस पंचवीस वर्षाची शेतातील फळझाडे कोसळून पडले. घराची छते उडाली,घराची भीत पडली , बकरी मृत्यूमुखी पडली, तर अनेक जनावरांना दुखापती झाल्या.

सदर घटनेची माहिती मिळताच सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग तात्काळ गावात पोहचून नुकसानीची पाहणी केली व तलाठी,ग्रामसेवक व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसानीची पाहणी करून शासनास पंचनामे सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोयर , नंदू वराडकर , गजानन सेडाम, तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: