Homeराज्यतोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या तिन आरोपींना केले जेरबंद…

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी करणाऱ्या तिन आरोपींना केले जेरबंद…

Share

  • विशेष व्याघ्र संरक्षण दलाची विशेष कामगीरी
  • वर्षानुवर्षांपासुन होतेय अवैध मासेमारीचा प्रयत्न
  • १५० किलोच्या मासेमारी जाळ्यासह एक बोट केली जप्त

राजु कापसे, रामटेक

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या तोतलाडोह जलाशयात गेल्या कित्येक वर्षापासुन लगतच्या भागातील लोकांकडुन बंदी असतांनाही अवैधरित्या मासेमारीचा निष्फळ प्रयत्न केला जातो व त्यांच्या त्या प्रयत्नाला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे पथक हानुन पाडत असतात. असाच अवैध मासेमारी चा प्रयत्न काल दि. २० जुलै ला सायंकाळ च्या सुमारास अवैध मासेमारांकडुन करण्यात आला. मात्र गस्तीवर तटस्थ असलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या पथकाने आरोपींचा तो प्रयत्न हानुन पाडला व ३ मासेमारांसह एक बोट व १५० किलो मासेमारीचे जाळे जप्त करण्यात आल्याची माहीती पुर्व पेंच चे वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांनी दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्राद्वारे मासेमारी विरोधी कारवाई दरम्यान 3 आरोपींसह बोट पकडल्या. पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये सामायिक असलेल्या तोतलाडोह जलाशयात नियमितपणे अवैध मासेमारी होत असते. गुरुवार दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी विशेष व्याघ्र संरक्षण दल, तोतलाडोह – ०१, पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्राच्या तुकडीने तोतलाडोह धरणाच्या मेघदूत जलाशयात अवैध मासेमारी करताना १५० किलो मासेमारीच्या जाळ्यासह एक बोट जप्त केली. याशिवाय वसंत अंताराम उईके, रा. परसोनी, ऋतिक सुरेश दयारे, रा. परसोनी, सुभाष केमाजी खंडाते, रा. परसोनी, या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यावेळी आरोपी मासेमारांकडील सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींना पुढील तपासासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, रामटेक यांच्यासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांनी दिली. डॉ. प्रभु नाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर व श्री. अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विवेक राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, विशेष व्याघ्र संरक्षण दल, तोतलाडोह – ०१, पेंच व्याघ्र प्रकल्प यांनी सदर कार्यवाही पार पाडली आहे.

तोतलाडोह जलाशयाचे संरक्षण आणखी वाढवण्यासाठी सर्व बोटींची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. बोटींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून नियमितपणे ॲम्बुश ऑपरेशन्स हाती घेण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुप्त सेवा निधीचा उपयोग गुप्तचरांचे प्रभावी जाळे तयार करण्यासाठी केला जात असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांनी माहिती देतांना सांगीतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: