Thursday, April 25, 2024
Homeराज्यमाविम ने निर्माण केलेले महिला बचत गट आता कुटुंब झाले…

माविम ने निर्माण केलेले महिला बचत गट आता कुटुंब झाले…

Share

आमदार अमित झनक यांचे गौरवदगार : सीएमआरसी मालेगाव २ ची एजीएम उत्साहात संपन्न

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

शासनाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ची स्थापना १९७५ मध्ये केली महिलांचा सर्वागीण विकास साधण्याचा उद्दात हेतू घेऊन महिला बचत गटाची संकल्पना राबविली आज बचत गटांनी प्रगती साधली आहे सीएमआरसी ची निर्मिती होऊन एक तप १२ वर्ष झाले आहेत त्यामुळे महिला बचत गट केवळ एक संस्था नसून शासनाचे अविभाज्य भाग असून कुटुंब झाले आहे असे गौरवदगार रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांनी केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे माविम स्थापित लोकसंचालीत साधन केंद्र मालेगाव २ ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मां साहेब लॉन मालेगाव येथे ता. १४ रोजी मोठया उत्साहात पार पडली .मालेगाव तालुक्यातील ३५ . गावामधील ३०२ गटाचे नेतृत्व करणाऱ्या सीएमआरसी लोकसंचालित साध्य केंद्र मालेगाव २च्या संस्थेची १२ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुनिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

सभेस उद्घाटक म्हणून रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित सुभाषराव झनक उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून माविम चे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे नाबार्ड चे डीडीएम शंकर कोकडवार आरसेटी डायरेक्टर डी एम बोईले रामेश्वर आप्पा गोंडाळ उत्तमराव राठोड अतिथी म्हणून संचालक लता खडसे, वैशाली गायकवाड, संगीता गायकवाड, रेखा कांबळे, कौशल्या गव्हांदे, शिला कंकाळ, वंदना गायकवाड, विमल मुठाळ उपस्थित होते, सभेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर संस्थेचे व्यवस्थापक प्रा . शरद व्ही . कांबळे यांनी संस्थेचा .सन २०२२- २३ चा लेखाजोखा सादर केला संस्थेचे ऑडीट काम, मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, वार्षिक लिंकेज, बिझनेस प्लान मंजुरी देणे, विविध प्रकल्प राबविणे, गोडंबी युनीट मान्यता, अधिकारी कर्मचारी यांना २० टक्के मानधन वाढ देणे सीएमआरसी ला दुसरा व चौथा शनिवार सुट्टी देण्यात यावी कार्यालय दुरुस्ती व रंगकाम करणे सहयोगीनी फिल्ड व्हीजीट वाढविणे उत्पन्नानुसार मानधन देणे इत्यादी ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले.

यावेळी आमदार अमित झनक यांनी महिलांनी बचत गट माविम च्या माध्यामातून आर्थिक सामाजिक शैषणिक विकास साधला आहे आता उधोगात भरारी घेतली हि बाब वाखाणण्याजोगी आहे असे प्रतिपादन केले. आरएमओ केशव पवार यांनी माहिलांना प्रबोधित करतांना माहिलांनी आर्थिक सामाजिक राजकिय दृष्टया सक्षम बनुन आपल्या अपत्यांना भयमूक्त धाडसी अंधश्रद्धेपासुन परावृत्त केले पाहिजे, तसेच गौतमबुद्ध यांनी सांगितल्या प्रमाणे पंचशील नुसार पंचसूत्री चे गटाने पालन करावे एकजुटीने काम करावे असे आवाहन केले. व महिलांचे संघटन हेच सीएमआरसी चे यश आहे असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगीतले. यावेळी नाबार्डचे कोकाडवार आरसेटी चे बाईले यांची भाषणे झाली.

कार्यक्रमात तिरंगा थाळी स्पर्धा घेण्यात आली विजेत्यांना तसेच पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार वितरीत करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटाच्या महिला . सहयोगीनी यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देउन गौरव करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन प्रा शरद व्ही. कांबळे यांनी केले आभार व्यवस्थापक प्रदीप तायडे मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी लेखापाल अनित्य सावळे सहयोगीनी पुष्पा गवळी , चंद्रभागा माने , सुनिता सुर्वे , जया गायकवाड, भारती चक्रनारायण सीआरपी यांनी अथक परिश्रम घेतले.सभेस .१५०o महिलांची उपस्थिती लाभली . कार्यक्रमाची सांगता बफे स्नेहभोजनाने करण्यात आली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: