Friday, February 23, 2024
Homeग्रामीणमुर्तिजापूर बाय-पास वरील पोलिस चौकी झाली नेस्तनाबूत...

मुर्तिजापूर बाय-पास वरील पोलिस चौकी झाली नेस्तनाबूत…

Share

मिलिंद इंगळे, मुर्तिजापूर

मुर्तिजापूर येथे हायवेचे रुंदीकरण व फोरवेचे काम झपाट्याने चालू असताना रोडवर येणाऱ्या तिस वर्ष आधीची बायपास चौकातील वाहतूक पोलीस चौकी केली जमीनदोस्त. पोलिस चौकी वरून उड्डाणपुलाचे काम होणार असून महाकाय खांब तयार करण्यात आले आहे. लवकरच खोळंबणाऱ्या वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

शहराच्या मुख्य ठिकाणी येणाऱ्या बायपास चौकातील पोलिस चौकी वाहतूक नियंत्रणास या आधी खूप मदत झाली आहे.पण चार पाच वर्षापासून ती तशीच बंद व ओसाड पडलेली होती, काही व्यापाऱ्यांनी तिथे अतिक्रमण ही केले होते. पण पोलिसांनी त्यांना पळवून लावले होते.

आता रोडच्या कडेला वसणाऱ्या बेरोजगारी किरकोळ धंदेवाईकांचे चांगलीच कोंडी झाली आहे.आपले बस्तान उचलून इकडे तिकडे फिरावे लागत आहे. या बायपासवर जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची पण चांगलीच गर्दी होत आहे.

लांब पल्यावरून येणाऱ्या ट्रक, ट्रॅव्हल्स चे पण चौकातच थांबा असल्यामुळे बायपास चौकात भराभराटी व रहदारी जास्तीत जास्त आहे. बायपास परिसरात लोकसंख्या लक्षात घेता पडलेल्या लेआऊट चे वस्ती व नगरात कसे रुपांतर झाले कळलेच नाही. काही दिवसांनंतर रोडमुळे शहरात खूप बदल दिसणार आहे. हे सर्वांना माहीतच आहे.परंतू नुतनीकरण झाल्यावर ही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणार की नाही अशी आशा शहरास लागलेली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: