Saturday, May 4, 2024
Homeराज्यसांगली | श्री कृपा कन्स्ट्रक्शन च्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात...

सांगली | श्री कृपा कन्स्ट्रक्शन च्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न…

Share

श्रीकृपा कंस्ट्रक्शन चे काम कौतुकास्पद ……नामदार सुरेश भाऊ खाडे.

सांगली – ज्योती मोरे

2011 साली सुरू झालेल्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या,श्री कृपा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या नूतन अध्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले,

यावेळी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वसंतराव दादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल दादा पाटील, प्रसिद्ध रंगोली कार आदम आली मुजावर, नगरसेवक विष्णू माने, मैनुद्दीन बागवान ,प्रसिद्ध उद्योजक अण्णासाहेब चकोते, माजी महापौर संगीताताई खोत ,नगरसेविका कल्पनाताई कोळेकर,

सोनाली ताई सागरे,राजेंद्र कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांचे स्वागत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तात्यासाहेब खोत व सौ. कविता तात्यासाहेब खोत यांनी केले.

सदर कार्यालयाच्या उद्घाटन समारंभासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रामध्ये माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज नगरसेवक विष्णू माने, अरुण गतारे आदी मान्यवर उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: