Tuesday, May 7, 2024
Homeराज्यजाणता राजाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी…आकोटकरांनी अनुभवली भव्य शोभायात्रा…

जाणता राजाच्या जयघोषाने दुमदुमली नगरी…आकोटकरांनी अनुभवली भव्य शोभायात्रा…

Share

आकोट – संजय आठवले

आकोट शहर व ग्रामिण भागामध्ये शिवरायांच्या जिवनकार्यावर विविध उपक्रम राबवुन त्यांचा जन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.शहरातून वाजत-गाजत निघालेल्या भव्य मिरवणुकीमधील महाराजांच्या जयघोषाने अवघी आकोट नगरी दुमदुमली होती. शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्य निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१९ फेब्रुवारीला सकाळी छत्रपति शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला मान्यवरांच्या व उत्सव समितीच्या पदाधिका-यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बस स्थानक, रेल्वे स्टेशन, जिजामाता चौक, श्री शिवाजी महाविद्यालय, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शिवाजी नगर येथे शिवरायांच्या प्रतिमांचे व तैलचित्रा़चे उत्सव समिती पदाधिका-यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

दुपारच्या सुमारास शिवाजी नगर,एलीचपुर वेस येथुन सजविलेल्या ट्रॅक्टरवरुन शिव प्रतिमेची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. स्थानीक कलाकारांनी अश्वावर बसलेल्या जिजाऊ माऊसाहेब,छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर मावळ्यांच्या साकारलेल्या आकर्षक वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या.

भजन मंडळी, लेझिम पथक, आखाडा, ढोलपथक तथा ब्रास बँड पार्टीच्या तालावर तरूणाई बेधुंद होऊन थिरकत होती. मिरवणुकीमध्ये यु्वतींची लक्षणीय हजेरी होती. मिरवणुक मार्गावर ठीकठिकाणी सडा शिंपडून व त्यावर रांगोळ्या काढुन शोभायात्रेचे स्वागत केले गेले.शोभायात्रेच्या पुर्वी पंधरा दिवसापासुन शिवजयंती उत्सव समितीच्या वतिने विविध उपक्रम राबविण्यात आले.

त्यामध्ये श्री शिवाजी महाराजांच्या जिवनावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, शिव अभिनय स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर अशा प्रकारे विविध उपक्रम राबवुन पंधरवाडा साजरा करण्यात आला. शहर पोलीस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी व सहका-यांनी पोलीस बदोबस्त चोख ठेवला होता.

शिवजयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक संजय गोरे, राजेश नागमते, अविनाश गावंडे, प्रभुदास तळोकार, श्रीजीत कराळे आदिंच्या मार्गदर्शनात समितीचे अध्यक्ष मुकुंद नागमते, कार्याध्यक्ष आकाश निंबोळकर, सागर उकंडे, गोपाल मोहोड, प्रतीक गोरे, निनाद मानकर, चेतन मर्दाने, चेतन देवळे, प्रसन्न जवंजाळ, अनंता मिसाळ, रामभाऊ शिंगणारे, अनिकेत कुलट,अमित काळे, उपाध्यक्ष सागर कराळे, उमेश हरसुलकर, अक्षय जायले, शुभम सोनोने, सुहास वाघ,

सचिव गोपाल पेढेकर, रितेश पाचकोर, सहसचिव मनीष थोरात, मंगेश राणे, अनिल लोळे, कोषाध्यक्ष चेतन गुर्‍हेकार, वैभव गुहे प्रसिद्धी प्रमुख शिवा टेमझरे, किरण चिंचोळे, सहप्रसिद्धीप्रमुख वृषभ कुचेकर, प्रणव चोरे, मंदार गुलाहे, शुभम वालसिंगे, अक्षय सोनटक्के,शुभम काळे, दुशंत वानखडे, लावण्य मिसळे, ओम घोरड, बजरंग मिसळे, वैभव आसरकर, गोलु भगत, अचल बेलसरे, रितेश बेलसरे, विक्रांत पालखडे, नीरज देशमुख, गिरीश ढगेकार, शुभम वालशिंगे, अनिकेत पोतले, भुषण लील्हरे आदिसह शिवप्रेमी युवक व नागरीकांचे सहकार्य लाभले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: