Friday, May 24, 2024
Homeगुन्हेगारीनरखेड | दिव्यांश्यूच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट, गावकऱ्यांनी वर्तवली घातपाताची शक्यता...

नरखेड | दिव्यांश्यूच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट, गावकऱ्यांनी वर्तवली घातपाताची शक्यता…

  • सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे.
  • जादू टोन्यातुल बळी घेतल्याची चर्चा.
  • विहिरीवर जाणारा रस्ता खडतर.
  • मुलगा विहिरीवर एकटा जाऊच शकत नसल्याची घरच्यांची प्रतिक्रिया.
  • मुलाच्या मारेकऱ्यांचा शोध लावा गावकऱ्यांची मागणी.
  • पोलिस अधीक्षक यांनी स्वतः येऊन करावी घटना स्थळाची पाहणी.

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील सिंजर येथे मनाला सुन्न करणारी घटना शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास उघड आली. गुरवारी सायंकाळी 5 वाजता पासून हरवलेल्या मुलाचा गावालगतच्या शेतातील विहिरीत सापडला मृतदेह. दिव्यांशू देवेंद्र भिल्लम असे मृत मुलाचे नाव आहे. तो 3 वर्ष 6 महिन्याचा होता.

गुरवारी सायंकाळी 5 च्या सुमारास बहिणीच्या मागे काकांकडे असलेल्या कार्यक्रमात गेला असल्याचे सांगण्यात येत होते परंतु तो काकांकडे पोहचलाच नाही. सर्वत्र त्याचा शोध घेतला तो कुठेही सापडला नाही. पोलिसांनी व डॉग स्कॉड यांनी सुध्दा मुलाचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो कोणालाही सापडला नाही.

शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास गावालगतच्या शेतातील विहिरीत त्या मुलाचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे ज्या विहिरीत मुलाचा मृतदेह सापडला त्या विहिरीत गावातील नागरिकांनी गुरवारी रात्री 8 च्या सुमारास पाहणी केली तेव्हा त्यांना त्या विहिरीत मुलाचा मृतदेह दिसला नाही. तसेच विहरीकडे जाणारा रस्ता इतका खडतर आहे की तो लहानसा मुलगा त्या रस्त्यांनी एकटा जाऊ शकत नाही.

तसेच त्या रस्त्यावर काटे सुध्दा असल्यामुळे बिना चपल्लनी एखादा मोठा व्यक्ती जाणे शक्य नाही तर तो 3 वर्षाचा मुलगा कसा जाईल हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस म्हणतात की तो मुलगा त्या रस्त्यांनी गेला असावा तर मग त्या रस्त्यांनी बोरीचे काटे आहेत त्यामुळे त्या मुलाच्या पायावर कसलेही निशाण का नाही?. गावकरी रात्रीच्या वेळेस त्या विहिरीत मुलाला शोधायला गेले तेव्हा तो मुलगा त्या विहिरीत दिसला का नाही?.

तो मुलगा त्या रस्त्यांनी जात होता तर आजू बाजूच्या लोकांना दिसला कसा नाही ? विहिरीत जर पडला तर त्याच्या शरीरावर लागल्याचे निशाण का नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जादू टोन्यातून सुध्दा मुलाला उचलल्या जाऊ शकते अशी शक्यता काही गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच हा खूनच असल्याचे गावकरी म्हणत आहे. त्यामुळे पोलिसही सर्व बाजूंनी कसून चौकशी करावी अशी मागणी मुलाच्या घरच्यांनी व गावकऱ्यांनी केली आहे. पोलिस अधीक्षक यांनी स्वतः येऊन या घटनास्थळ ची पाहणी करावी अशी मागणी गावकरी करत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments