Friday, May 17, 2024
HomeMarathi News Todayधन्यवाद मिसेस चढ्ढा...राघव चढ्ढा यांनी शेअर केला रॉयल वेडिंग व्हिडिओ...पाहा

धन्यवाद मिसेस चढ्ढा…राघव चढ्ढा यांनी शेअर केला रॉयल वेडिंग व्हिडिओ…पाहा

Share

न्यूज डेस्क : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे तरुण खासदार राघव चढ्ढा कायमचे एकत्र झाले. दोघांनीही पंजाबी रितीरिवाजानुसार आज म्हणजेच २४ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात लग्न केले. या गोंडस जोडप्याचे लग्न बरेच दिवस चर्चेत होते आणि अखेर उच्च सुरक्षेत दोघांच्या लग्नाचे सर्व विधी आनंदाने पार पडले. अशा परिस्थितीत या दोघांच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर बरेच व्हायरल झाले. आता राघव चढ्ढा यांनी परिणीतीच्या गाण्याच्या आवाजातील व्हिडीओ नुकताच शेयर केला.

खासदार राघव चढ्ढा यांनी X वर व्हिडीओ पोस्ट करताना लिहले, “मला कधीच अशी भेट मिळेल असे वाटले नव्हते, पण मला वाटते की माझ्या गायक पत्नीला मला आश्चर्यचकित करणे आवडते! मी खरच भारावून गेलो आहे…तुझा आवाज आता माझ्या आयुष्याचा साउंडट्रॅक बनला आहे…आमच्या आयुष्याचा…धन्यवाद श्रीमती चढ्ढा…मी स्वत:ला जगातील सर्वात भाग्यवान माणूस समजतो की तू माझ्या पाठीशी आहेस.”


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: