Monday, May 6, 2024
Homeराज्यपातूर येथे शिक्षक दिन साजरा...

पातूर येथे शिक्षक दिन साजरा…

Share

पातूर – निशांत गवई

लोकहित शिक्षण प्रसारक मंडळ,पातूर द्वारा संचलित हाजी सैय्यद अकबर उर्दू हायस्कूल व सायन्स जुनिअर कॉलेज,पातूर जि.अकोला येथे दि.५ सप्टेंबर २०२३ मंगळवार रोजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य शे.नुसरतुल्लाह यांनी विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर दिनाचे औचीत्त्ये सांगून भारताचे दुसरे राष्ट्रपती व भारतरतन डॉ.सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यंना मार्गदर्शन केले.

नंतर दुसरा सत्रात शाळेचे इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक बनऊन तासिका घेतली.तिसरा सत्रात संस्था सचिव मा.सैय्यद अकबर अब्दुल्लाह सैय्यद मोहसीन यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अनेक विद्यार्थ्यांनी डॉ .सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले तसेच इयत्ता ९ वी चे विद्यार्थ्यांनी नवीन उपक्रम घेतला असून शिक्षकांना आपले शालेय जीवनातील संबंधीत विविध रोमांचक प्रशन विचारले असून विद्यार्थी सह इतरांनी याचा आनंद घेतला.

संचालन प्राचार्य शे.नुसरतुल्लाह यांनी केले तर आभार शे. रिजवान यांनी मानले.कार्यक्रमाचा यशासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्य लाभले


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: