Sunday, May 5, 2024
Homeराज्यअमरावती | कु.प्रज्ञा भाऊराव ढंगारे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्‍काराने सन्‍मानित...

अमरावती | कु.प्रज्ञा भाऊराव ढंगारे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्‍काराने सन्‍मानित…

Share

अमरावती – ५ सप्‍टेंबर शिक्षक दिनाचे औचित्‍य साधून मनपा शिक्षण विभागाद्वारा आयोजित सन्‍मान सोहळ्यात मनपा उच्‍च प्राथमिक शाळा, महादेवखोरी, अमरावती येथे कार्यरत कर्तव्‍यदक्ष आणि उपक्रमशील शिक्षिका कु. प्रज्ञा भाऊराव ढंगारे यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

मनपा आयुक्‍त देविदास पवार, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम यांचे हस्‍ते हा पुरस्‍कार सन्‍मानचिन्‍ह व प्रमाणपत्र या स्‍वरुपात प्रदान करण्‍यात आला. याप्रसंगी मनपाचे इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगिन विकासासाठी कटीबध्‍द राहून कार्य करीत राहण्‍याचे अभिवचन प्रज्ञा ढंगारे यांनी यावेळी दिले. त्‍यांनी या सोहळ्याचे उत्‍कृष्‍ट सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेत हातभार लावला. शैक्षणिक कार्यासोबतच त्‍या सामाजिक कार्यात सुध्‍दा सदैव अग्रेसर असतात.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: