Saturday, May 4, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे मा .प्रवीणचंद्र लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी येथे मा. प्रवीणचंद्र लुंकड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे पुढील प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम येथे स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. त्याचे प्रमुख अतिथी म्हणून सौ. निता केळकर स्टेट एक्झिक्यूटिव्ह कमिटी मेंबर ऑफ भाजपा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम यांचे स्नेहसंमेलनासाठी श्री. जयंत आसगावकर विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य( शिक्षक आमदार पुणे विभाग) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच 15 डिसेंबर 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ,उत्तुर कोल्हापूर येथे दत्तात्रय देसाई व श्री स्वप्नील पवार प्रमुख पाहुणे म्हणून यांच्या हस्ते स्नेहसंमेलनचे उद्घाटन होणार आहे.

दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम विजयनगर म्हैसाळ तसेच दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी सुरज फाउंडेशन चा सर्व स्टाफ व विद्यार्थी यांना स्नेहभोजन तसेच दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय खुला गट पुरुष हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

मा प्रवीण चंद्र लुंकड हे सुरज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी 1994 साली नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम ची स्कूल ची सुरुवात केली त्यानंतर 19 94 ते 2003 या कालावधीमध्ये राज्य शासनाची क्रीडा प्रबोधिनी कार्यरत होते सुरुवातीच्या काळामध्ये अगदी चार विद्यार्थ्यांच्यावर ही स्कूल सुरू करण्यात आली होती आज 2000 विद्यार्थी या स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.

या संस्थेची खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई- दिल्ली प्रमाणे ज्या नवीन नवीन उपक्रम राबविले जातात त्याच धर्तीवर व तत्काळ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुद्धा विविध उपक्रम राबविले जात असतात त्यामध्ये रोबोटिक्स लॅब, लैंग्वेज लॅब, एनक्रिश वेब टेक प्रायव्हेट लिमिटेड ,आयआयटी व मेडिकल सेंटर, इंटरॅक्शन बोर्ड ,वेदिक मॅथ्स ,अबॅकस ,मल्टी स्किल असे उपक्रम आहेत तसेच सुरज फाउंडेशन या संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुरज स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत अनेक जिल्हा,

विभागीय, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत त्यातील प्रामुख्याने स्मृती मानधनासारखे खेळाडू तयार झाले असून आत्तापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत तसेच तसेच सन 2022 साली जिल्हास्तरीय शालेय 14 व 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच सुब्रोतो जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक व शालेय जिल्हास्तरीय 14 17 वर्षाखालील जलतरण स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिप ,शालेय नेटबॉल व सेफकटकरा या स्पर्धेत 14 17 19 वर्षाखालील प्रथम क्रमांक ,

अथलेटिक स्पर्धेत अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड तसेच तलवारबाजी ,कुस्ती ,स्केटिंग व बुद्धिबळ स्पर्धेत ही जिल्हा विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंची निवड झाली त्याचबरोबर पुणे बालेवाडी स्टेडियम प्रमाणे नव कृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड एमआयडीसी येथे खेळाच्या सर्व त्या सोयी सुविधा उपलब्ध असून प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र प्रशिक्षकाची व्यवस्था आहेत,

तसेच नव कृष्णा व्हॅली बोटॅनिकल गार्डन येथे ऑक्सी पार्क येथे तीन गुंठ्यामध्ये मियावाकी उपक्रम राबवला असून त्याचबरोबर सहा गुंठ्यामध्ये बांबू गार्डन व दोन गुंठ्यामध्ये पाम गार्डन असा हा परिसर निसर्गरम्य केलेला आहे श्री प्रवीणचंद्रजी लुंकड यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन असते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम कुपवाड एमआयडीसी, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम कुपवाड एमआयडीसी,

नव कृष्णा व्हॅली स्कूल जुनियर कॉलेज कुपवाड एमआयडीसी ,सुरज स्पोर्ट्स अकॅडमी कुपवाड एमआयडीसी ,एनक्रिश वेब टेक प्रायव्हेट लिमिटेड कुपवाड एमआयडीसी ,मेडिकल व आयआयटी सेंटर कुपवाड एमआयडीसी ,सहेली महिला समीक्षीकरण संस्था कुपवाड एमआयडीसी ,नव कृष्णा व्हॅली बोटॅनिकल गार्डन ,सुरज ललित कला अकादमी कुपवाड एमआयडीसी, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम विजयनगर, म्हैसाळ।

नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, उत्तुर (कोल्हापूर ) या प्रकारच्या विविध ठिकाणी संस्था कार्यरत असून चांगल्या प्रकारचे शैक्षणिक सामाजिक व कला क्षेत्रात कार्य करत आहेत अशा विविध संस्थेवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीणचंद्रजी लुंकड यांचा वाढदिवस सर्व मुलांना भेटवस्तू देऊन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या सौ संगीता पागनीस डायरेक्टर, सुरज फाउंडेशन यांनी दिली यावेळी संस्थेतील विभाग प्रमुख उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: