Friday, May 3, 2024
Homeखेळराज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेकरीता आयुषी भाजीपालेची निवड... राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे सुयश...

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेकरीता आयुषी भाजीपालेची निवड… राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे सुयश…

Share

रामटेक – राजु कापसे

स्पर्धेत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रामटेक येथील वर्ग 10 वीची विद्यार्थीनी कु आयुषी अमृत भाजीपाले हिने 64 किलो वजनगटात भंडारा येथे संपन्न झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.यामुळे तिची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.

मौदा तालुक्यातील खरडा या गावखेड्यात राहणाऱ्या आयुषीने अत्यन्त कठीण आणि हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढून रोज सकाळी 10 पासून तर 5 वाजेपर्यंत रामटेकपर्यंतचा शालेय शिक्षणासाठी 20 किमीचा प्रवास करून आणि रोज पहाटे कोदामेंढी येथील ग्राऊंडवर जाऊन सराव करून हे यश प्राप्त केलेले आहे.

तसेच जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग ,पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक पटकाविला.सोबतच वर्ग 9 ची विद्यार्थीनी हिना नरेश मसुरके हिने कुस्ती फ्रिस्टाईल स्पर्धेत 42 किलोगटात जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.आयुषीने आपल्या यशाचे श्रेय आई संगीता भाजीपाले ,क्रीडा शिक्षक राजेश भोतमांगे, मुख्याध्यापक राजु बर्वे यांना दिले आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव देशमुख सचिव मयंक देशमुख प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक निलेश टोंगसे,दर्यापूरकर सर,सेलोकर सर ,क्रीडा शिक्षक राजेश भोतमांगे व मुख्याध्यापक राजू बर्वे,शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी आयुषी भाजीपाले व हिना मसुरके यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: