Thursday, May 2, 2024
Homeराज्यऊस वाहतूकदारांचा तरुण भारत स्टेडियमवर विविध मागण्यांसाठी मेळावा...

ऊस वाहतूकदारांचा तरुण भारत स्टेडियमवर विविध मागण्यांसाठी मेळावा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

ऊस तोडणी मुकादमा कडून दरवर्षी होणारी कोट्यावधीची फसवणूक त्यातून देशोधडीला लागणारे ऊस वाहतूकदार, त्यांच्या वाढलेल्या आत्महत्या,हे सूत्र थांबलं पाहिजे. यासाठी ऊस तोडणी टोळी करार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातून आणि केंद्रीकरण पद्धतीनेच झाली पाहिजे.

या मुख्य मागणीसाठी आज सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ऊस वाहतूकदार संघटनेचे नेते पैलवान पृथ्वीराज पवार,अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, निमंत्रक संदीप राजोबा यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास विश्रामबाग मधील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ट्रॅक्टर रॅली काढून सुरुवात करण्यात आले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: