Sunday, May 12, 2024
Homeराज्यइनरव्हील क्लब ऑफ सनराईजची सामाजिक बांधिलकी: उपेक्षित समाजाप्रति आपुलकी - दिव्यांग अमित...

इनरव्हील क्लब ऑफ सनराईजची सामाजिक बांधिलकी: उपेक्षित समाजाप्रति आपुलकी – दिव्यांग अमित राठोडला दिली व्हीलचेअर…

Share

गोकुळ शिरगाव – इनरव्हील क्लब ऑफ सनराईज ,कोल्हापूर या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी उपक्रमातून एका उपेक्षित महिलेला शिलाई मशीन व  उजळाईवाडी (ता.करवीर) येथील अमित धर्मसिंग राठोड (वय-२३) या दिव्यांग मुलाला व्हीलचेअरची भेट दिली. या दोन्ही उपेक्षित कुटुंबाप्रति   दिलेल्या अनमोल भेटीतून इनरव्हील क्लबने  माणुसकीच्या धाग्यातून आपुलकी जपली आहे.

कोल्हापूर येथे आयोजित शानदार कार्यक्रमात 

उत्कर्षा पाटील, डॉ. विद्युत शहा, चेअरमन महानंदा चंदरगी,  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सोनाली पटेल, सेक्रेटरी सपना भालकर, प्रोजेक्ट कोर्डीनेटर सौ.सुरेखा जाधव, सौ.शिल्पा अष्टेकर,स्मिता खामकर, सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते, यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्षा  महानंदा चंदरगी यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली.

आम्ही समाजाचे देणं लागतो. उपेक्षितांचे आयुष्य सुंदर व्हावं.आजही काही लोक असह्य वेदना घेऊन जगत आहेत. दिंव्यांग अमितला व्हीलचेअरची गरज असल्याची माहिती मोहन सातपुते यांनी दिली. त्यानुसार त्यास व्हीलचेअर दिल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान लाभले.

सुरेखा जाधव,शिल्पा अष्टेकर(प्रोजेक्ट को-र्डीनेटर) 
सदस्या – इनरव्हील क्लब ऑफ सनराईज


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: