Thursday, May 2, 2024
Homeनोकरीदानापूर येथे आरोग्य केंद्रात १६ पदे रिक्त; रुग्णांची गैरसोय...

दानापूर येथे आरोग्य केंद्रात १६ पदे रिक्त; रुग्णांची गैरसोय…

Share

दानापुर – गोपाल विरघट

तेल्हारा तालुक्यातील दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव,आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,औषधी निर्माण अधिकारी,मुख्यालय आरोग्य सेविका,परिचर,अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत,येथील आरोग्य केंद्रात एकुण १६ पदे रिक्त असुन,रुग्णसेवा पुर्णपणे कोलमडली आहे.परिणामी रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे.

दानापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील ४० ते ४५ हजारांच्या वर ग्रामस्थांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण ३४ गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असुन एकुण सात उपकेंद्र आहेत.त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र औषधी गोळ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे; मात्र सद्यस्थितीत या केंद्राचाभार केवळ १३ ते १४ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर असल्याने आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे.

येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासह इतर कार्यक्रम राबवणे कठीण झाले आहेत.डॉक्टर व कर्मचारी कमी असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साथ रोगाचे दिवस असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात किटकजन्य व जलजन्य आजाराची साथ पसरण्याची शक्यता आहे. तरी वरिष्ठांनी त्वरित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

रिक्त असलेले पदे

वैद्यकीय अधिकारी २ पैकी १ रिक्त,आरोग्य केंद्रात नियमित आरोग्य सेविका एकुण मंजूर पदे ८ असून त्यापैकी ४ रिक्त, आरोग्य सेवक एकुण ७ पैकी ४ रिक्त, आरोग्य सहाय्यक एकुण २ पदांपैकी १ रिक्त, सिएचओ एकुण ७ पैकी ४ पदे रिक्त, औषधी निर्माण अधिकारी पद बऱ्याच वर्षांपासून रिक्त,मुख्यालय आरोग्य सेविका पद रिक्त, परिचय एकुण ४ पैकी २ पदे रिक्त आहेत.

1)दानापुर आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत.मि संबंधी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांना अनेक वेळा रिक्त पदे भरण्याकरीता मागणी केलेली आहे. परंतु अद्याप ही रिक्त पदे भरण्यात आलेले नाही. संबंधीत अधिकारी जरका याकडे दुर्लक्ष करीत असतील तर मला जनते करिता रस्त्यावर उतरावे लागेल.
गजानन काकड
जि.प.सदस्य,आकोला

2) बरेच पदे रिक्त असल्याने कामाचा बराच तान सर्वच कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो तरी सुद्धा आंम्ही रुग्णांना सेवा देण्याचे प्रयत्न करीत असतो.
डॉ.एस.एम.काळे, प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी, दानापुर


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: