Thursday, November 30, 2023
Homeराज्यशहापूर जवळ शिवसेना शिंदे गटाच्या बसला अपघात, १८ जण जखमी…जीवित हानी नाही...

शहापूर जवळ शिवसेना शिंदे गटाच्या बसला अपघात, १८ जण जखमी…जीवित हानी नाही…

Spread the love

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबई मध्ये पार पडला. यांनतर मुंबई हुन सिल्लोड ला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आणि १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती हाती येत आहे.

सदर अपघात आज पहाटे ४ च्या सुमारास शहापूर जवळ कळंभे गावाजवळ झाला आहे.. शिंदे गटाच्या बसला मागून एका ट्रक ने धडक दिली आणि यांनतर या ट्रक ला शिंदे गटाच्या दुसऱ्या बसने धडक दिली..

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस शहापूर केंद्र चे कर्मचारी,शहापूर पोलीस मदतीला घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे..


Spread the love
Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: