Saturday, April 27, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शरद पवार साहेबांच्या निर्णयाचे साखर वाटून...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शरद पवार साहेबांच्या निर्णयाचे साखर वाटून स्वागत…

Share

सांगली – ज्योती मोरे.

देशाचे नेते आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी २ मे रोजी निवृत्ती चा निर्णय घेतला होता, पण महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांच्या भावना चा विचार करत आदरणीय पवार साहेबांनी आज राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहण्याचा निर्णय घेतला.

त्या अनुषंगाने हा निर्णय झाल्या झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटली.

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की , आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला हा आनंद आमच्या साठी शब्दात सांगण्यासारखा नाही आहे, आज आम्ही नागरिकांमध्ये साखर वाटप करून आनंद व्यक्त केला आहे, पवार साहेबांमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला सामाजिक व राजकीय जीवनात काम करण्याची ऊर्जा नेहमीच मिळत असते, ती आता पुढेही अशीच मिळत राहणार आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.

यावेळी राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज ,महापौर दिग्विजय सुर्यवंशी , हरिदास पाटील , उत्तम कांबळे , समीर कुपवाडे , अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे , छाया जाधव , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , अर्जुन कांबळे ,अजित दुधाळ, संदीप व्हनमाणे , आकाराम कोळेकर मुन्ना शेख , कुमार वायदंडे विजय जाधव अक्षय शेंडगे आदी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: