Homeराज्यसांगलीमध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न...

सांगलीमध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांच्याविषयीचा अवमान यापुढे सहन करणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजप नेत्यांनी बुधवारी दिला. भाजपच्या वतीने सांगलीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.

सांगलीतील यात्रेत भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटना, सावरकर प्रेमी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. सांगलीतील बाळासाहेब ठाकरे चौकातून सायंकाळी यात्रेला सुरुवात झाली. ‘आम्ही सारे सावरकर’ असा फलक हाती घेत, भगव्या टोप्या परिधान करुन सावरकर प्रेमी सहभागी झाले होते. राजवाडा चौक, हरभट रोड, मारुती रोड या मार्गे ही यात्रा मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली.

यात्रेचे रुपांतर सभेत झाले. यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, काँग्रेस नेते सावरकर यांच्या विषयी टीका करतात. त्यांची लायकी काय हे जनतेला माहित आहे. सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांची सेवा करण्याची संधी माझ्या वडिलांना मिळाली. त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत.

माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्यागाचा इतिहास असताना जाणीवपूर्वक काँग्रेस नेते सावरकरांवर टीका करीत आहेत. सावरकरांचा अपमान म्हणजे हिंदुत्वाचा व देशाचा अपमान आहे. तो आम्ही सहन करणार नाही. यात्रेत खासदार संजयकाका पाटील, शेखर इनामदार, स्वाती शिंदे, दीपक शिंदे, मंजिरी गाडगीळ, दीपक माने, भारती दिगडे, महिंद्र चंडाळे, श्रीकांत शिंदे आदी नगरसेवक व वीर सावरकर प्रेमी सहभागी झाले होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: