Friday, May 10, 2024
Homeराज्यसांगली जिल्हा पोलीस दलाकडून जागतिक योग दिन उत्साहात साजरा...

सांगली जिल्हा पोलीस दलाकडून जागतिक योग दिन उत्साहात साजरा…

Share

सांगली — ज्योती मोरे.

आज 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.त्या निमित्ताने सांगली जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक, मा. बसवराज तेली यांचे उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात योगासने करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार असे मिळून सुमारे 25 अधिकारी व 275 अंमलदार उपस्थित होते.

तसेच मिरज विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रनील गिल्डा, सांगली विभागाचे पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव असे उपस्थित होते. योग प्रशिक्षक म्हणून अमेय पाटील.सौ.ज्योती अमेय पाटील व त्यांची टीमने योग साधनेचे धडे दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक मनीलाल पवार,विजय पानपाटील यांनी उत्तम प्रकारे केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: