Sunday, April 28, 2024
Homeराज्यशिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या प्रयत्नामुळे नॅशनल हायवे पासून जागृती ज्ञानपीठ शेलोडी...

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या प्रयत्नामुळे नॅशनल हायवे पासून जागृती ज्ञानपीठ शेलोडी कडे जाणारा रस्ता केला पुन्हा सुरू…

Share

बुलडाणा – हेमंत जाधव

दिनांक ०७/०१/२०२३ रोजी नॅशनल हायवे क्रमांक सहा वरून जागृती ज्ञानपीठ कडे जाणारा रस्ता Monto karlo कंपनीकडून डीवाईडर बांधून बंद केला होता.आणि याच्या आधी कित्येक रस्ते त्यांनी रस्त्यामध्ये डीवाईडर बांधून बंद केलेले होते. आणि कुठल्याही परिस्थितीत ते जागृती कडे जाणारा रस्ता सोडण्यास तयार नव्हते. डिव्हायडर बांधण्याचे काम सुद्धा सुरू होते.

अशा परिस्थितीमुळे जागृती कडे जाणारी सर्व विद्यार्थ्यांचे वाहन एक दोन किलोमीटर वरून आऊट साईटने आणावे लागत होते. त्यामध्ये एक्सीडेंट होण्याची फार मोठी भीती होती तरीसुद्धा Monto karlo कंपनी ऐकण्यास तयार नव्हती.
जेव्हा काम सुरू असताना शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्कूल बस चालकाने सांगितले तेव्हा राजेंद्र बघे व काही शिवसैनिक घेऊन तिथे गेले तेव्हाच त्यांचे सुरू असलेले काम बंद केले आणि त्यांना सांगितले तुम्ही हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत बंद करू शकत नाही कारण तुम्ही हा रस्ता बंद केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारख होईल कारण त्यांना रोज आऊट साईड ने वाहने आणून शाळेच्या दिशेने न्यावे लागतात त्यामध्ये एक्सीडेंट होण्याची फार मोठी भीती आहे.

व तेव्हाच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलून त्यांना सांगितले हा रस्ता आपण बंद करू शकत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला अकोला अमरावती नागपूर ऑफिसला तसे पत्र द्यायला सांगितलं आम्ही तसे पत्र सुद्धा केशव महाराज पेसोडे व जागृती ज्ञानपीठ शिक्षक यांनी तसे पत्र सुद्धा दिले. त्यानंतर सुद्धा त्यांनी एक दोन वेळेस रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.

परंतु शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाटला वारंवार त्याचा पाठपुरावा करून बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे यांना वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बोलून रस्ता सोडण्यास भाग पाडले व आज रोजी जागृती कडे जाणारा रस्ता पूर्णपणे सोडून चांगल्या स्थितीत केला आहे.

त्याबद्दल जागृत कडे जाणारे वाहन चालकांनी तसेच पालकांनी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचे आभार मानले.
परंतु हा एक रस्ता झाला तरी असे बऱ्याच ठिकाणी रस्ता बांधून सर्विस रोड न ठेवता डायरेक्ट रस्ता बंद केला आहे.
त्यामध्ये चितोडा अंबिकापुर कारेगाव हिंगणा गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला असून पाचशे मीटर वरून वाहने आऊट साईडने न्यावं लागत आहेत.

त्यामध्ये दोन-तीन एक्सीडेंट च्या घटना सुद्धा घडल्या आहेत. तशीच परिस्थिती लांजूड चिखली आमसरी तिथे सुद्धा हीच परिस्थिती होती. परंतु खासदार प्रतापराव जाधव यांचा दौरा असताना तिथे सर्व गावकरी त्यांना भेटले व त्यांचा सर्विस रोडचा व बस स्टॉप चा मार्ग मोकळा झाला.

परंतु गव्हाण फाट्यावरील सर्विस रोडचा प्रश्न बाकी आहे लवकरात लवकर आणि बाळापूर पासून ते खामगाव पर्यंत कुठल्या स्टॉप वरती संबंधित कंपनीने आज पर्यंत बस स्टॉप उघडले नाही उलट दहा ते बारा किलोमीटर आतील सर्व वाहन धारकाकडून सस्तीने टोल वसूल करण्यात येत आहे.

मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिले होते मागणी केली होती १० किलोमीटर आतील सर्व वाहनधारकांना टोल माफी द्यावी परंतु संबंधित अधिकारी मोफत देण्यास तयार नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही साडेतीनशे रुपयाची महिन्याभराची पास काढावी परंतु ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही महिन्यातून दोन ते तीन वेळा बाळापुर किंवा अकोल्याला जाण्याकरिता साडेतीनशे रुपये देणे शक्य नाही नाहीतर तुम्ही फास्टट्रॅक लावा त्यामध्ये दोनशे रुपये सुद्धा बॅलन्स असला तरी तो टोल कटत नाहीत नगदी ८० रुपये मागतात दोन्ही साईटच्या 160 रुपये कोलरी गावासारख्यांना बाळापुर ला जातो म्हटल्यास चार ते पाच किलोमीटर करिता 160 रुपये मोजावे लागत आहेत.

काही नोकरी वर्गाला ही गोष्ट परवडणारी आहे परंतु सामान्य नागरिकाला बिलकुल परळणारी गोष्ट नसून नागरिक टोलनाक्यामुळे हैराण झाले. काही महिन्यातच पिंप्री गवळी फाटा येथे रोडला फार मोठ्या चर पडून रस्ता खराब झाला आहे वाहन जोरजोरात हालून एक साईडला जातो आणि एक्सीडेंट होण्याची फार मोठी भीती आहे. रोड कडे,बस स्टॉप कडे, व सर्विस रोड,कडे लक्ष न देता फक्त टोल वसुलीकडेच टोल मालकांचे व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

येत्या काळात टेंभुर्णा पिंप्राळा,पिंप्री गवळी,कोलरी कारेगाव, हिंगणा,चितोडा, अंबिकापुर,पळशी,लोणी, कदमापूर इत्यादी गावांमधून टोल वसुली,सर्विस रोड,बस स्टॉप याकरिता टोलनाक्यावरती शिवसेनेच्या पुढाकारातून फार मोठे आंदोलन उभे राहणार आहे. मागील आंदोलनात ज्यांचे सहकार्य राहिले ती पुढील प्रमाणे.

शिवसेना अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख नळेगाव सरपंच प्रकाश हिवराळे,सोशल मीडिया तालुकाप्रमुख सोपान वाडेकर, गोपाल इंगळे,शेख समीर,श्रीकृष्ण इंगळे,संतोष टिकार,बाळा टिकार,लक्ष्मण काकडे,मंगेश इंगळे,नारायण गावंडे,अक्षय गायकवाड, आदींचे सहकार्य लाभले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: