Sunday, May 12, 2024
Homeराज्यचाचेर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न...

चाचेर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

चाचेर,ता.मौदा येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अ‍ॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी,मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप चाचेर येथील परमात्मा एक भवन येथे आयोजित करण्यात आले होते.

महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ पतासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण- १३२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-३१, औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं-१०,व चष्मे करिता-९१ लाभार्थींनी लाभ घेतला.

आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.

यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: