Friday, May 3, 2024
Homeराज्यबुलढाणा | जिल्हाधिकारी यांना विनंती पूर्वक निवेदन...

बुलढाणा | जिल्हाधिकारी यांना विनंती पूर्वक निवेदन…

Share

बुलढाणा – आगामी नवरात्री व दांडिया उत्सवाला ध्यानात घेऊन हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनामध्ये जिहादी विकृत मानसिकतेचे लोक येणाऱ्या काळात, नवरात्र उत्सवात दांडिया मध्ये लव्ह जिहाद, चीडीमारी सारखे प्रकार मुद्दाम हून घडवतात ते रोखणे बाबत व नवरात्र उत्सवात महिलांना सुरक्षा देण्यात यावी तसेच आपल्या संपूर्ण भारत देशात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा होत असतो ती आपल्या देशाची परंपरा आहे.

मात्र गेल्या काही वर्षात काही जिहादी विकृतीचे लोक तसेच चिडीमार या मातृशक्ती, आदीशक्ती चे दांडिया या धार्मिक उत्सव मध्ये नाव बदलून प्रवेश घेतात व लव्ह जिहाद सारखे भयंकर प्रकार घडवून आणतात, आम्ही प्रथम कायद्याचा सन्मान करणारी माणसे आहोत असे प्रकार आपण कायदेशीर रोखावे किंवा दांडिया उत्सव यांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली,

दांडिया च्या ठिकाणी बहुदा असे प्रकार नेहमीच घडतात म्हणून दांडिया खेळण्यासाठी आधार कार्ड आदीं ओळखपत्र पडतालुनच प्रवेशद्यावा अश्या मागण्या ही करण्यात आल्या,निवेदन देते वेळी विजय पवार जिल्हा प्रमुख हिंदुराष्ट्र सेना राकेश चोपडा राजेश पिंगळे जितेंद्र रनालकर गजानन शास्त्री ठेंग आदीं सह हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: