Friday, May 10, 2024
Homeसामाजिकलाखपुरी येथे रमजान ईद उत्साहात साजरी व सर्व समाज बांधवान कडुन अलिंगन...

लाखपुरी येथे रमजान ईद उत्साहात साजरी व सर्व समाज बांधवान कडुन अलिंगन देवुन एकमेंकाना दिल्या शुभेच्छा…

Share

लाखपुरी – मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे रमजान ईद निमीत्य सर्व धर्म भाव लाखपुरी मध्ये दिसले यावेळी सर्वगुरुदेव सेवा मंडळ, लक्षेक्ष्वर संस्थान सेवाधारी, ग्राम पंचायत पदाधिकारी ,गावातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पुलिस प्रशासन व पत्रकार बांधव व गावातील नागरिकांन कडुन स्वागताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सर्व प्रथम आयोजितांनी मुसलिम बांधवाना ईद निमीत्य गुलाब देवुन शुभेच्छा देण्यात आल्या व मुसलिंम बांधवाना थंड पाणी व नास्ता वाटप करण्यात आले.

शुभेच्छा कार्यक्रमास मुसलिम बांधवान मधुन यावेळी लियाकत अली पटेल , मो. हुसेन ,मीर मुदस्सीर अली मास्टर ,नासीर हुसेन ,करिम खॉ ,नजाकत अली पटेल , मो. याकुब मास्टर ,मो. वसिम ड्रायवर ,मो. अत्ता उल्लाह , जुनेद अली मास्टर , शे.वजीर कुरेशी , रमजु ठेकेदार , इकबाल ठेकेदार , मोभिन इंजिनिअर , इ. मुस्लिम बांधव व सै. अफसर मौलाना (नमाज पाठंतर ) ,

मुफस्सीर अली यांनी संचालन केले व त्यांनी बोलतांना सागितले की जशा प्रकारे हिन्दु बांधवानी आमच्या करिता ईद निमीत्य शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजीत केला अशाच प्रकारे कुठल्याही जाती धर्मांचा कार्यक्रम असल्यास आपण सर्व मिळुन साजरा करु जेणे करुन सर्व धर्म समभाव हि भावना लाखपुरी मध्ये टिकुन राहिल असे त्यांनी उध्दगार काढले.

यावेळी आयोजकांन मधुन राजु दहापुते , ठाकुरदास अरोरा ,प्रेमनारायण कैथवास , डिगाबर नाचणे ,राजु कैथवास ,विजय तामसे , नाना मेहर , दिलीप सुरजुसे , विनायक नवघरे , रामनारायण कैथवास , पुरुषोत्तम डागा ,सुरेश जामनिक , बालुभाऊ देशमुख योगेश देशमुख ,ओमप्रकाश बनभेरू , दत्ता जामनिक , फीलीप जामनिक , प्रमोद लोखंडे , अर्जुन जामनिक , राष्ट्रपाल कोकणे , डिगांबर उघडे ,उमेश वरणकार , दिलीप घनमुळे , तुळशिराम वरणकार , वैभव घनमुळे , प्रमोद अवघड , पुरूषोत्तम घनमुळे ,

डॉ . दिलीप नवघरे , ब्रह्मदेव जामनिक ,गोवर्धन जामनिक , राकेश पुरोहीत , ओम जयस्वाल , अजय डवरे , संतोष उभाळ , अवि देशमुख, श्रीकांत देशमुख , सचिन तामसे ,पंकज चतुर , नितीन सरजुुुसे , पत्रकार अतुल नवघरे , आकाश जामनिक व मुर्तिजापुर ग्रामिण पोलिस स्टेशनचे खेडकर साहेब व गजानन सय्याम व सहकारी , गावातील ग्रामस्थ . इ उपस्थीती होती व कार्यक्रम शांततेने पार पडला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: