Monday, December 11, 2023
HomeMarathi News Todayवा रे राजकारण!...आमदारकीच्या तिकिटावरून बाप-लेकीत भांडण...बापाने भावाची बाजू घेतल्याने बहिणीने भावाला चप्पलने...

वा रे राजकारण!…आमदारकीच्या तिकिटावरून बाप-लेकीत भांडण…बापाने भावाची बाजू घेतल्याने बहिणीने भावाला चप्पलने केली मारहाण…व्हिडीओ व्हायरल

Spread the love

न्यूज डेस्क : राजकारणात साम, दम, दंड, भेद याचा वापर तर करतातच सोबतच नाते संबधात खेळ खेळल्या जातो याच उदाहरण राजस्थानच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. राजस्थानमध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीने तिकिटासाठी भावाला चप्पलने मारहाण केल्याचे विचित्र दृश्य पाहायला मिळाले. हे प्रकरण जयपूरमधील भाजप कार्यालयाबाहेरचे आहे. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी आमदार जयराम जाटव आणि त्यांची मुलगी मीना कुमारी या दोघांनाही पुढील विधानसभा निवडणुकीसाठी अलवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट हवे आहे. माजी आमदाराच्या मुलाने वडिलांच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मीना कुमारीने भावाला चप्पलने मारहाण केली.

भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मीना कुमारी यांनीही वडिलांवर गंभीर आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. मीना यांनी स्वत:च्या वडिलांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून तिचे वडील जयराम जाटव यांनी चुकीच्या पद्धतीने जमीन घेतल्याचा दावा केला आहे.

आपल्या जीवाला धोका असल्याचे वर्णन करत मीना कुमारने तिचे वडील आणि भावावरही तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे भावाला चप्पलने मारहाण झाल्याच्या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कोणालाही निवडणूक लढवण्याचा आणि पक्षाकडून तिकीट मिळवण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी निश्चितपणे सांगितले.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: