Sunday, April 28, 2024
Homeराजकीयपुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच - या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या...

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच – या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी खाजगी एजंटाना विकू नयेत – खा संजय पाटील…

Share

सांगली – ज्योती मोरे

पुणे ते बेंगलोर या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून या महामार्गाची एकूण लांबी 690 किलोमीटर इतकी असून महाराष्ट्रा त तो एकूण 202 किलोमीटर इतका असणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये या महामार्गाची लांबी 74 किलोमीटर इतकी असून यामध्ये 38 गावांचा समावेश आहे त्यामधील खानापूर तासगाव कवठेमंकाळ मिरज इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे.

सदर महामार्ग हा खानापूर तालुक्यातून 24 किलोमीटर तासगाव तालुक्यातून 26 किलोमीटर कवठेमंकाळ तालुक्यातून वीस किलोमीटर आणि मिरज तालुक्यातून चार किलोमीटर इतका असणार आहे. या महामार्गामध्ये खानापूर तालुक्यातील बारा तासगाव तालुक्यातील 14 कवठेमंकाळ तालुक्यातील नऊ तर मिरज तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे.

या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या रेडी रेकनर पेक्षा चौपट पटीने तर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत ज्या क्षेत्रामधून सदर महामार्ग जाणार आहे अशा शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या दुप्पट मोबदला दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही दलालाच्या भूलथापांना बळी पडून आपल्या जमिनी कवडीमोल किमतीत विकू नयेत असे आवाहन खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे.

दरम्यान या महामार्गामध्ये येणाऱ्या घरे बागा झाडे झुडपे विहिरी तसेच इतर साधन संपत्तीचा विविध शासकीय यंत्रणांकडून सर्वे होऊन त्याचा योग्य तो मोबदला संबंधितांना दिला जाणार आहे. शिवाय हा मोबदला मिळण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील शेतकरी महसूल अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, कृषी विभाग यांचे संयुक्त संवाद मिळावे त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी लवकरात लवकर घेऊन शेतकऱ्यांच्या शंका कुशंकां सोडविण्यात येणार आहेत.

याचबरोबर कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी मधील ड्रायपोर्टची लवकरात लवकर उभारणी करून शेतकऱ्यांच्या शेतीमाल आणि उद्योगधंद्यांना चालना देणार असल्याचेही खासदार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: