Saturday, April 27, 2024
Homeराज्यटीचर्स असोसिएश फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप) राज्य अधिवेशन, पुणेसंदर्भात महिती देण्यासाठी...

टीचर्स असोसिएश फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप) राज्य अधिवेशन, पुणेसंदर्भात महिती देण्यासाठी पत्रकार परिषद…

Share

विनाअनुदानित तंत्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप ) ही एकमात्र नोंदणीकृत संघटना आहे. टॅफनॅपचे राज्यस्तरीय अधिवेशन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. जे. पी. नाईक सभागृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये विनाअनुदानित तंत्रशिक्षण क्षेत्रामध्ये बोकळलेला भ्रष्टाचार, संस्थाचालक व शासनाकडून ह्या कर्मचाऱ्यांवर होणार अन्याय, दिले-घेतले पद्धतीने होणारे वेतन, कर्मचाऱ्यांची सेवाशास्वती व नियमित नेमणूक पत्रासाठी केली जाणारी पिळवणूक, खोटी महिती सादर करून शिक्षण शुल्क समितीची केली जाणारी फसवणूक व त्याकडे शिक्षणशुल्क समितीचे जाणून बुजून दुर्लक्ष या सारख्या अनेक समस्यांवर चर्चा होणार आहे. टॅफनॅप संघटनेचे जेष्ठ सदस्य प्रा. सुभाष पतके यांचा ॲड. सुरेश पाकळे यांच्या हस्ते संघटनेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे.

टॅफनॅपच्या वेबसाईटचे उद्घाटन व परिवर्तन विशेषांकाचे प्रकाशन या अधिवेशनामध्ये होणार आहे. टॅफनॅपच्या पुणे अधिवेशना संबंधी पत्रकार बंधूना अधिक महिती देण्यासाठी फेब्रुवारी २०२४ रोजी वार दि.येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेसाठी आपली लोकप्रिय दैनिकाचे वरिष्ठ पत्रकार आपण नियुक्त करावेत ही विनंती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: