Wednesday, February 21, 2024
Homeगुन्हेगारीPoonam Pandey | पूनम पांडेच्या प्रसिद्धी स्टंट अंगलट आला...मृत्यूची खोटी माहिती दिल्याप्रकरणी...

Poonam Pandey | पूनम पांडेच्या प्रसिद्धी स्टंट अंगलट आला…मृत्यूची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार दाखल…

Share

Poonam Pandey : स्वतःच्या निधनाची माहिती देवून देशात खळबळ माजवून प्रसिद्धी घेणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. काल शुक्रवारी तिच्या मॅनेजरने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून तिची मृत्यूची माहिती दिली होती. आता अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिचे निधन झाले नाही. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना पूनमने ती जिवंत असल्याची माहिती दिली आहे. यानंतर अभिनेत्रीवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Poonam Pandey alive | अभिनेत्री पूनम पांडेनी लोकांना मुर्खात काढल?…तिच्या मृत्यूची बातमी खोटी…खोटी अफवा का पसरवली?…

मृत्यूचे सत्य बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आता एआयसीडब्ल्यूएचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी पूनम पांडेच्या बनावट मृत्यूच्या स्टंटविरोधात मुंबईतील विक्रोळी पार्क साइट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेने स्वतः इंस्टाग्रामवर एका लाइव्ह व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, तिच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाला नसल्याचे तिने सांगितले आहे. पूनम पांडे म्हणते की, तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी हे केले. मात्र पूनम पांडेचा हा जोक तिला चांगलाच महागात पडला आहे. जेव्हापासून ही गोष्ट सोशल मीडियावर समोर आली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेकजण तिच्या या स्टंटबाजीवर नाराज आहेत.

शुक्रवारी अभिनेत्री पूनम पांडेच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची माहिती दिली होती. मॅनेजरने उघड केले की त्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देऊन 1 फेब्रुवारीच्या रात्री जगाचा निरोप घेतला. दरम्यान, राहुलसह अनेक सेलिब्रिटींनी पूनमच्या मृत्यूला फेक म्हटले आहे आणि चाहत्यांना प्रश्नही विचारले आहेत. आता ही बातमी समोर आल्यानंतर पूनमला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: