Saturday, April 27, 2024
Homeराज्यपातूर वाशीम महामार्ग वरील अपघातात एक ठार...

पातूर वाशीम महामार्ग वरील अपघातात एक ठार…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर वाशीम महामार्ग वर असलेल्या तहसील जवळ ट्रक व मोटारसायकल च्या अपघातात एक जण गंभीर झाल्याचि घटना आज दिनांक 27 फेब्रुवारी चे 11:30 वाजता च्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम कडून येत असलेल्या ट्रक क्रमांक GJ 10 TV 8631 ने मोटारसायकल क्रमांक MH 30 BT 1274 ह्या मोटारसायकलस्वार नामें सूरज शंकर देशमुख रा. बेलूरा हा या अपघातात गंभीर जखमी झाला असता घटनास्थळी जखमी ह्यासपत्रकार दुले खान,

मेडशी येथील मोहसीन खान,अजगर अली शेख वसीम, आबेद खान आदी. मदतीला धावून आले असता जखमी सुरज देशमुख यास पातूर येथील युवा व्यावसायिक सचिन देशमुख यांनी स्वतःजखमी यास त्यांच्या चारचाकी ने तात्काळ पुढील उपचारा साठी अकोला येथे नेत असतांना जखमी सुरज देशमुख यांचा मृत्यू झाला तर घटने चि माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली हे.

कॉ. दिलिप इंगळे, हे. कॉ.मोहन भारस्कर मेजर, सत्यजित ठाकूर, होमगार्ड नरेंद्र गवई यांनी धाव घेऊन घटनास्थळ चा पंचनामा करण्यात आला असून ट्रक चालक हा पातूर पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे वृत्त लिहस्टोवर पातूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: