Monday, May 6, 2024
Homeराज्यपातुर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनलचा एकहाती झेंडा..! १८ पैकी १६...

पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनलचा एकहाती झेंडा..! १८ पैकी १६ जागेवर वरचष्मा…

Share

शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा…एका जागी अपक्ष व केवळ एका जागेवर शेतकरी परिवर्तन पॅनल विजयी.

पातुर – निशांत गवई

पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 30 एप्रिल रोजी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला व आपली एक हाती सत्ता कायम ठेवली. पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच चुरस पाहायला मिळाली तसेच 18 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते.

1 जागा अविरोध झाली होती. 92 % टक्के मतदान या निवडणुकीत झाले असून प्रशासनाच्या नियोजनाचा मतमोजणी दरम्यान हलगर्जीपणा व फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले तसेच मतमोजणी केंद्र बाहेर रात्री उशिरापर्यंत अंधारच दिसून आला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ,व वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित रित्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून 18 जागापैकी 16 जागांवर आपला वर चष्मा कायम ठेवला असून शेतकरी परिवर्तन पॅनल ला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीसाठी 92 टक्के मतदान झाले असून भर पावसातही उमेदवार व मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सर्वपक्षीय सहकार पॅनल व परिवर्तन शेतकरी पॅनल मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असून सायंकाळी पाच वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला होता.

ही निवडणूक प्रक्रिया येथिल वसंतराव नाईक विद्यालय पातुर या केंद्रांवर रात्री जवळपास अडीच वाजेपर्यंत चालली होती.

…. विजयी उमेदवार…
सेवा सहकारी संस्था सर्व साधारण मतदारसंघातून… राजेश विष्णुपंत महल्ले, राजेंद्र नारायणराव देशमुख, शंकर बंडू राठोड ,मनोहर नामदेव शिंदे ,चंद्रकांत शालिग्राम अंधारे ,अरुण मारोती कचाले, दीपक सुरेंद्रकुमार उजाडे,

महिला प्रतिनिधी मतदार संघातून सिंधुबाई साहेबराव देवकते व संगीता संजय खोंड

इतर मागासवर्गीय मतदार संघातून
गोपाल गणपतराव महल्ले

भटक्या जाती विमुक्त जाती मतदारसंघातून
चरणकुमार लक्ष्मण चव्हाण

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून माणिकराव देवराव तायडे (शेतकरी परिवर्तन पॅनल)
गोटीराम तुकाराम चौरे हे ईश्वरचिठ्ठीने विजय झाले ( राही डोंगरे या तीन वर्षीय मुलीच्या हाताने ईश्वरचरणी काढण्यात आली)
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून – राष्ट्रपाल दादाराव गवई
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून – राजेश रामचंद्र भाकरे
व्यापारी अडते मतदारसंघातून – अर्जुन राजाराम टप्पे (अपक्ष)
व मोसिनखा शफीउल्लाखा – आदी उमेदवार निवडून आले तर

हमाल मापारी मतदारसंघातून शेख मुख्तार शेख नजीम हे एकमेव उमेदवार अविरोध निवडून आले होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनय बोराडे यांनी काम पाहिले तर पातूरचे तहसीलदार रवींद्र काळे व तसेच रमेश इंगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव किरण तायडे, संजय भगत व मोजदारखा व अन्य कर्मचारी अधिकारी यांनी यावेळी त्यांना सहकार्य केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: