Saturday, September 23, 2023
Homeक्रिकेटक्रिकेटर मोहम्मद शमीच्या अटकेसाठी पत्नीने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव...पत्नी हसीन जहाँने केले...

क्रिकेटर मोहम्मद शमीच्या अटकेसाठी पत्नीने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव…पत्नी हसीन जहाँने केले ‘हे’ गंभीर आरोप…

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी वाढू होण्याची शक्यता आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शमीच्या अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हसीन जहाँने तिच्या याचिकेत कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे ज्याने शमीविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटवर सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती.

विशेष म्हणजे शमीच्या पत्नीने तिचे वकील दीपक प्रकाश, नचिकेत वाजपेयी आणि दिव्यांगना मलिक वाजपेयी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. असा आरोप आहे की शमी तिच्याकडून हुंडा मागायचा आणि BCCI संबंधित दौऱ्यांवर बोर्डाने दिलेल्या खोल्यांमध्ये वेश्यांसोबत अवैध संबंध ठेवायचा.

याचिकेत म्हटले आहे की, या प्रकरणी अलीपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. शमीने मात्र या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले, ज्याने अटक वॉरंट आणि संपूर्ण प्रकरणातील पुढील कार्यवाहीला स्थगिती दिली. यानंतर हसीन जहाँने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु उच्च न्यायालयानेही अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला.

हसीन जहाँच्या याचिकेत म्हटले आहे की, कोणत्याही सेलिब्रिटीला कायद्यानुसार विशेष दर्जा मिळू नये. या याचिकेत म्हटले आहे की, न्यायालयाचा हा आदेश कायद्यात स्पष्टपणे चुकीचा आहे, जे जलद खटल्याच्या अधिकाराला महत्त्व देते. क्रिकेटपटूच्या बाबतीत चार वर्षांपासून या प्रकरणाची प्रगती झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: