Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयबेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच…

बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच…

Share

सेवा खंडित करण्याची लेखी धमकी देणाऱ्या बीडीओचा निषेध. नोटीशीचे उत्तर न देण्याचा घेण्यात आला निर्णय….

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. बेमुदत संपाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशीही जिल्हा परिषदेच्या सर्व १०० टक्के कर्मचाऱ्यांनी हजेरी लावून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यात सर्व कर्मचारी संघटनांचा सहभाग होता. तत्पूर्वी अंदोलनकर्त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संपकरी काही आणखी कर्मचाऱ्यांना सेवा खंडित करण्याची बीडीओंनी नोटीस बजाविली. नोटीस बजाविणाऱ्या त्या बीडीओंचा निषेध करण्यात आला. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली त्यांनी उत्तरे देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले.आजच्या आंदोलनाची विशेषतः म्हणजे अनेक अंध व दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होऊन नारे निदर्शने केली.

“एकच मिशन जुनी पेन्शन” योजना लागू करण्यासाठी शनिवारी १८ मार्चला यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान सकाळी ११ वाजता नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय – निम शासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मोर्चात सर्व पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. या मोर्चात किमान ५० हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी केला.

जिल्हा परिषदेत मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून सोमवारी २० मार्च पासून पुन्हा नव्या जोमाने जिल्हा परिषद परिसरात आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली.

आजच्या आंदोलनात ज्यांनी नेतृत्व केले त्यामध्ये संजय सिंग, डॉ. सोहन चवरे, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ, विजय बुरेवार, गोपीचंद कातुरे,अरविंद मदने, संजय तांबडे, सुजित अढाऊ, संतोष जगताप, भास्कर झोडे, किशोर भिवगडे, अक्षय मंगरुळकर, सुभाष पडोळे, जयंत दंढारे, योगेश राठोड, निरंजन पाटील, उमेश जायेभाये, योगेश हरडे, संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे, अलका खंते, हेमा सुरजुसे आदी कर्मचारी नेत्यांचा सहभाग होता.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: