Saturday, May 4, 2024
Homeराज्यगडचिरोली | राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ क वर नागेपल्ली नजीक मोठ्या खड्यात फसले...

गडचिरोली | राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ क वर नागेपल्ली नजीक मोठ्या खड्यात फसले दोन ट्रक…

Share

महामार्गावरील वाहतूक ठप्प…

गडचिरोली – आलापल्ली-नागेपल्लली नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.353 क वर लोहखनिज वाहतूक करणारे दोन ट्रक रस्त्या मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यामध्ये फसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सकाळपासूनच ठप्प झालेली आहे. याचा नाहक त्रास या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे.

साकोली ते सिरोंचा दरम्यान असणाऱ्या या महामार्गावर महाराष्ट्र व तेलंगणा ला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. बोरी ते रेपनपल्ली या दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्या मुळे अनेकदा अपघात होऊन जिवीत हानी झालेली आहे.मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्याच्या दुरुस्ती करे साफ दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नागरिकांचा शासन व प्रशासनावर मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: