Saturday, May 4, 2024
Homeराज्यगडचिरोली | माजी आमदारानी स्वखर्चाने मार्गाची केली दुरुस्ती... एस.टी चा ही मार्ग...

गडचिरोली | माजी आमदारानी स्वखर्चाने मार्गाची केली दुरुस्ती… एस.टी चा ही मार्ग झाला सुकर…

Share

गडचिरोली – मूलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली-श्रीनगर-मूलचेरा मार्गावर श्रीनगर,देवनगर गावाजवळ अरुंद पूल असून पावसामुळे त्या पुला जवळ मोठ मोठे खड्डे पडल्याने एसटी महामंडळा कडून या रस्त्यावरून बससेवा बंद करण्यात आली बस सेवा बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व शेतकरी तथा नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता ही बाब आविस व बीआरएस चे पदाधिकारी यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम स्वतः त्या पुलाची आणि रस्त्याची पाहणी करून कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परिसरातील गावकरी समवेत स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे स्वतः श्रमदानाने बुजवून रस्ता सुरळीत करून दिला,

सध्या चे प्रशासन सुस्त असून त्यांना सामान्य नागरिक तथा शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या समस्याशी काही घेणं देणं नाही, संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून मागील अनेक वर्षापासून रस्ता दुरुस्ती किंवा नुतनिकरण झालेले नाही, अनेक रस्ते हे कागदोपत्री तैयार झाले असून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने अश्या पद्धतीचे मार्ग तैयार झाले आहे त्यामुळे शासनकडून दुरुस्ती आणि नूतनिकरण ची वाट न बघता आपण सर्व जणांनी श्रमदान करून हा मार्ग व्यवस्थित तैयार करू मार्ग व्यवस्थित नसल्याने शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यावर तथा सामान्य जण जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, दुरुस्ती साठी लागणारा खर्च मी स्वतः करेन असे आवाहन उपस्थितांना केले,

कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी दादा च्या आवाहणाला लगेच प्रतिसाद दिला, आणि बघता बघता हा मार्ग संकल्पनेतून वाहतुकीसाठी तैयार झाला, दीपक दादा यांनी लगेच एस टी महामंडळ सोबत संपर्क करून दुरुस्त केलेल्या मार्गवरून एस टी सुरु करण्याची मागणी केली आणि एस टी महांमंडळ ने ही मागणी लगेच मान्य करून एस टी बस सुरु केली, त्यामुळे आता शालेय विद्यार्थी आणि महिलांना कमी पैश्यात प्रवास आणि शेतकरी तथा इतर सामान्य नागरिकांना वाहतुकीचा मार्ग सोयीस्कर झाला,

शाळकरी विद्यार्थी, पालकवर्ग व शेतकरी तथा गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले रस्ता दुरुस्ती करतेवेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मूलचेरा बीआरएस नेते टिल्लू मुखर्जी, सुबोल मंडल,अनिल मंडल,बाबूल दास,सुधीर पोद्दार,कृष्णा सरकार,अविनाश दास,रॉबिन मिस्त्री,निताई बाला, बिनाई साना, मारोती बंडावार, मनमत रॉय सह श्रीनगर,देवनगर येथील गावकरी व आविस,बिआरएस चे पदाधिकारी आणि परिसरातील गावकरी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: