Saturday, June 1, 2024
HomeSocial Trendingलाइव्ह डिबेट टीव्ही शोमध्ये समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी...व्हिडिओ व्हायरल

लाइव्ह डिबेट टीव्ही शोमध्ये समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी…व्हिडिओ व्हायरल

न्युज डेस्क – वृत्तवाहिन्यांवरील लाइव्ह डिबेट टीव्ही शोमध्ये एखाद्याला न आवडणारी गोष्ट कोणी बोलली तर दुसरा इतका नाराज होतो की त्याचा संयम सुटतो. अश्याच एका शो दरम्यान दोन वेगवगळ्या पार्टीच्या समर्थकांची हाणामारी बघायला मिळाली. सदर घटना पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या लाइव्ह डिबेट टीव्ही शो दरम्यान घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आत्तापर्यंत असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लाइव्ह शो दरम्यान मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे, आता आणखी एक क्लिप समोर आली आहे ज्यामध्ये ‘पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज’ (PML-N) आणि पाकिस्तानच्या ‘तरहीक-ए-इन्साफ’ (PTI) च्या वतीने सिनेटर अफनान उल्लाह खान लाइव्ह डिबेट शोमध्ये बोलत आहेत. संबंधित शेर अफजल खान मारवत यांच्यात वाद झाला. काही वेळातच परिस्थिती इतकी बिघडली की दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्या मारल्या.

व्हायरल क्लिप X वर (@GabbbarSingh) नावाच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- पाकिस्तानचे वातावरण, जेव्हा तेथील क्रिकेटपटू भारतात मजा करत असतात.

1 मिनिट 8 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील प्रसिद्ध टीव्ही जावेद चौधरी यांच्या ‘कल तक’ कार्यक्रमादरम्यान पीएमएल-एनच्या सिनेटरने पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर लष्कराच्या अधिकाऱ्याशी संगनमत केल्याचा आरोप केला.

याशिवाय ‘बूटचॅट’ या शब्दाचाही उल्लेख होता. यानंतर पीटीआय प्रमुख संतापले. त्यानंतर शोच्या सुरुवातीलाच तो आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्याने सिनेटर अफनानला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. पण ते थांबले नाही.

खाली व्हिडीओ पहा

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments