Tuesday, April 30, 2024
Homeगुन्हेगारीछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पातूरातील तब्बल १० जणांना उपविभागीय अधिकारी यांनी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पातूरातील तब्बल १० जणांना उपविभागीय अधिकारी यांनी केले तात्पुरते तडीपार..!

Share

कारवाईत पातुर शिरला अंबाशी यांचा समावेश.

पातुर – निशांत गवई

पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवजयंती उत्सवातिथी निमित्त बाळापुर उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी येथील दहा जणांना जा.फ.क्रमांक 144 (2) नुसार पातुर शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये गैरअर्जदार संजय लव्हाळे वय 48 राहणार अंबाशी योगेश फुलारी वय 30 राहणार पातुर सचिन बंड 22 राहणार पातुर शिवम नीलखन 30 राहणार शिरला अमोल उर्फ जलवा तायडे वय 26 राहणार पातुर लखन पोहरे वय 32 राहणार पातुर सागर रामेकर वय 28 राहणार पातुर ज्ञानू सातव वय 27 राहणार पातुर सागर इंगळे वय 32 राहणार पातुर राहुल खोडे वय 26 राहणार पातुर यांचे वर गतकाळामध्ये दाखल झालेले व शांतता भंग करावयास कारणीभूत ठरणारे गुन्हे विचारात घेता बाळापूर उपविभागातील पातुर शहर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते.

त्यासाठी पातुर शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने 9 मार्च ते अकरा मार्च दरम्यान पातुर तालुका शहर हद्दीमध्ये उपस्थित न राहणे बाबतचे प्रस्ताव ठाणेदार यांनी उपविभागीय अधिकारी यांना प्रस्तावित केले होते. याबाबत बाळापुर उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2 ) आदेशित करण्यात आले आहे की 9मार्च 23ते अकरा मार्च दरम्यान तालुका हद्दीत प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे.

गतकाळात संबंधित पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील मध्ये दाखल झालेले व शांतता भंग करावयास कारणीभूत ठरणारे गुन्हे असणाऱ्यांवर दहा जणांना तात्पुरते तडीपार करण्याचे आदेश बाळापुर उपविभागीय अधिकारी यांनी 8 मार्च रोजी दिले आहेत .
हरीश गवळी ठाणेदार पातुर


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: