Thursday, May 2, 2024
Homeराजकीयनितीन गडकरींची आमदार पिंपळेंना टोलेबाजी…'त्या' प्रकरणावरून तर नाही ना?…

नितीन गडकरींची आमदार पिंपळेंना टोलेबाजी…’त्या’ प्रकरणावरून तर नाही ना?…

Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्ट बोलणारा नेता आहे, मग ते कोणालाही सोडत नाही असा चिमटा काढतात कि रक्त हे बाहेर येवू देत नाही, माणूस आपला असो वा परका, तोंडावर बोलून मोकळे होतात म्हणूनच त्यांच्यावर विरोधक सुद्धा तेवढच प्रेम करतात. कालच्या सभेत त्यांनी थेट आपल्या पक्षाच्या आमदाराच्या वजनावर बोलून अनेकांना बुचकळ्यात पाडलं. त्यांच्या बोलण्याचे काही राजकीय विश्लेकांनी वेगवेगळे अर्थ काढले. तर अनेकांच्या मते बडनेरा ते कुरूम या दरम्यान रस्त्याचा बीटूमस कॉंक्रीट विश्वविक्रम करणाऱ्या राजपथ कंपनीच्या सहयोगी कंपनी इगल इन्फ्रा यावर अतिरिक्त मुरूम उत्खनन केल्याची तक्रार स्वत आमदार पिंपळे यांनी केली होती. या कंपनीला अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ही दिला होता तर आणखी वडगाव येथील प्रकरण गडकरी साहेबांनी मध्यस्तीकरून मिटवल होत. कदाचित गडकरींना मागील किस्सा आठवला असेल म्हणूच तर वजनावर बोलले नसेल?…काय प्रकरण होते ते समजून घेवूया.

एकेकाळी हातगाव येथून कमळगंगा प्रकल्प सुरु करणारे आमदार हरीश पिंपळे यांची नितीन गडकरी स्तुती करतांना थकत नव्हते, पिंपळे यांना आपल्याच पक्षातून अनेकाचा विरोध असताना सुद्धा पिंपळे त्यांच्या बाजूने नेहमी तटस्थ असणारे गडकरी मात्र थेट वजनावर बोलले, काल झालेल्या महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणाचे लोकार्पण आणि मूर्तिजापूर-कारंजा मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना आमदार पिंपळेंनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांची बोलणी ऐकून वजन कमी झाल्याचा उल्लेख केला. तोच धागा पकडून गडकरी म्हणाले, ‘आता हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. त्यावर ५० वर्षे खड्डे पडणार नाहीत. रस्ता चांगला होईल. चिंता मात्र ही आहे की, पिंपळेंचे वजन वाढून १५० किलो व्हायला नको. नाहीतर चंद्र वाढतो कले कलेनी… हरीश वाढतो किलो किलोनी…’ अशा शब्दात गडकरींनी पिंपळेंच्या वजनावर मिश्कील टोला लगावला. मात्र या वक्तव्याचे अनेकांनी वेगळेवेगळे अर्थ काढायला सुरुवात केलीय.

गडकरी साहेब जेव्हा कमळगंगा प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते तेव्हा आमदार पिंपळे यांचं तोंडभरून कौतुक केले होते, कारण लोकवर्गणीतून एखादया लोकप्रतिनिधीने लोकहितासाठी चांगला प्रकल्प तयार करणे खरंच कौतुकास्पद होते. लोकांनी तेवढीच आमदार पिंपळे यांना साथ दिलीय. मात्र काही कुरापती लोकांनी त्यांना सल्ला देऊन खोलीकरणच्या नावाखाली मूर्तिजापूर तालुक्यातील काही गावात करोडो रुपयांचा मुरुमांचे उत्खनन करून सरकारला अक्षरशः लुटून खाल्लं, या पापात अधिकाऱ्यांचा सहभाग होता…मात्र आमदार पिंपळे कधीही ठेकेदारांची तक्रार केली नाही. मात्र हायवेवर बिटूमस काँक्रीटचा विश्वविक्रम करून गिनीज बुकात नाव नोंदविणार्या राजपथ कंपनीची सहयोगी कंपनी ईगल इन्फ्रा हीची क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केल्या प्रकरणी आमदार पिंपळे यांनी तक्रार करून कंपनीला तीन कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आणि वडगाव येथील अहवाल यायच्या आधीच हे प्रकरण गडकरी साहेबांच्या मध्यस्तीने मिटविले. म्हणून गडकरी साहेबांन प्रकरणाची आठवण झाली म्हणूनच टोला लगावला असेल असे अनेक राजकीय विश्लेषकांच मत आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: