Friday, February 23, 2024
HomeMarathi News TodayNepal Plane Crash | मित्रांना विमानाचे LIVE लँडिंग दाखवीत होता...अन काही सेकंदातच...लाईव्हमध्ये...

Nepal Plane Crash | मित्रांना विमानाचे LIVE लँडिंग दाखवीत होता…अन काही सेकंदातच…लाईव्हमध्ये अपघाताचा थरार चित्रित…व्हायरल Video

Share

Nepal Plane Crash : काल नेपाळ मध्ये यती एअरलाइन्स 9N-ANC ATR-72 विमानाने रविवारी सकाळी 10:33 वाजता काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी ते जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर कोसळले. या विमानात असलेल्या सर्व ७२ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. या विमानात पाच भारतीयांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात चार युवक हे उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील होते. चारही युवक नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते.

यापैकी सोनू जैस्वाल नामक तरुणाने आपल्या मित्रांना विमांचे तर अपघात होण्याच्या काही सेकंद आधी लाईव्ह व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती, जी अपघाताच्या दरम्यान देखील सुरु होती. सोनूच्या लाईव्हमध्ये या विमानाच्या अपघाताचा थरार चित्रित झाला आहे.

पोखरामधील विमान दुर्घटनेनंतर गाझीपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चारही मित्रांच्या निधनामुळे परिसरातील लोकांना मोठा धक्का पोहोचला आहे. या अपघातात सोनू जैस्वाल (३५) सोबत विशाल शर्मा (२२), अनिल कुमार राजभर (२७) आणि अभिषेक कुशवाह (२५) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: