Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यNCP च्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले तर गंगाधर परशुराम यांची महाराष्ट्र...

NCP च्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले तर गंगाधर परशुराम यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिस पदी नियुक्ति…

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ति पत्र…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांच्या निर्देशानुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने गंगाधर परशुरामकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सोबतच परशुरामकर यांना गडचिरोली निरक्षक म्हणुन पदभार देण्यात आला. तसेच गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जैन यांनी नवनियुक्त सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष यांना पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रेमकुमार रहांगगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, किशोर तरोने, केतन तुरकर, यशवंत परशुरामकर, करण टेकाम दिलीप डोंगरे, राजेशकुमार तायवाडे पत्रकार मिडिया प्रमुख , सुनील पटले ,शैलेश वासनिक, आरिफ़ पठान, प्रतीक पारधी, शरभ मिश्रा, वामन गेडाम सहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: