Saturday, April 27, 2024
Homeराज्यपारद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची स्व....

पारद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची स्व. विनोद भाऊ नागे यांच्या नागे परिवाराची सात्वन पर भेट…

Share

विनोद नागे यांनी वंचित बहुजन आघाडी मुर्तीजापूर तालुका अध्यक्ष पदाची धुरा १० वर्ष साभांळली…

लाखपुरी – अतुल नवघरे

मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील पारद येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष विनोद नागे यांचं ०४/११/२०२३ रोजी मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये, दुखद निधन झाले .विनोद नागे नेहमी गोर गरीबांचा मदतीला धावून जात असे त्यांच्या निधन झाले हि बातमी कळताच तालुक्यात शोककळा पसरली होती.

विनोद नागे यांचं व्यक्तिमत्व, अभ्यासु, मनमिळावू, नेहमी हसत मुख व एक कुशल राजकारणी असुन कधी कोणाशी वैर नव्हतं. विनोद नागे सर्वांचे प्रिय होते.विनोद नागे गेल्या मुळे मुर्तिजापूर तालुका पोरका झाला. त्यांच्या जाण्याने त्यांची जागा कोणीही घेवू शकणार नाही.

त्यांच्या अंतिम यात्रेचा कार्यक्रम ०५/११/२०२३ रोजी होता,विनोद नागे यांनी वंचित बहुजन आघाडी चे १० वर्ष तालुका अध्यक्ष असलेले विनोद भाऊ यांच्या परिवाराचे सात्वन करण्यासाठी दिनाक – ०७/११/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी च्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली ताई आंबेडकर विनोद नागे यांच्या पारद या मुळ गावी जाऊन त्यांच्या राहत्या घरी नागे परिवाराची भेट घेतली, त्यांचे सात्वन केले.

या मध्ये उपस्थीती मध्ये वंचित बहुजन महीला आघाडी च्या सदस्या, व मा.जिल्हा परिषद अध्यक्ष, विद्यमान जि प सदस्य पुष्पा ताई इंगळे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ वानखडे, वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष विक्की भाऊ गवई, वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते राजेश चोरे पाटील, प्रमोद भाऊ नागे , अशोक भाऊ नागे , गौरव भाऊ नागे गौरव भाऊ मेसरे व संपुर्ण नागे परिवार उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: