Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीनरखेड । अल्पवयीन मुलीवर अत्याचार...आरोपीला अटक

नरखेड । अल्पवयीन मुलीवर अत्याचार…आरोपीला अटक

Spread the love

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड – घरगुती संबंधाचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन महिन्यापूर्वी पासून अत्याचार करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून नरखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अनिल सुरेश टेकाडे वय ३२ वर्ष रा वॉर्ड क्र १२ , नरखेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी व अत्याचारित मुलीचे घर शेजारी आहे. त्यामुळे त्यांचे घरगुती संबंध होते. या संबंधाचा फायदा घेऊन आरोपीने जुलै महिन्यात अत्याचारित मुलीला घराशेजारी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये बोलावून अत्याचार केला. भीतीपोटी मुलीने याची वाच्यता केली नाही . याच परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपीने अत्याचारित मुलीला वारंवार पीडित केले.

या बाबत मुलीने मंगळवार दि १३ ला आईला सांगितली . आज गुरुवार ला नरखेड पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली. आरोपी विरुद्ध भा द वी ३७६, ४बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ( पोक्सो ) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली.

आरोपीस प्रथम श्रेणी दंडाधिकारी नरखेड न्यायालय येथे पेश केले असता १७ सप्टेंबर पर्यन्त पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव हे प्रकरणाचा तपास करीत आहे.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: