Friday, May 3, 2024
Homeग्रामीणमूर्तिजापूर | दुधलम येथील गावकरी पित होते मृत सापाचे पाणी...पिण्याच्या टाकीत आढळले...

मूर्तिजापूर | दुधलम येथील गावकरी पित होते मृत सापाचे पाणी…पिण्याच्या टाकीत आढळले दोन मृत साप…

Share

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या दुधलम गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, या गावातील पिण्याच्या पाण्याचा टाकीत दोन मृत साप आढळल्याने नागरिकांना धक्काच बसलाय. या प्रकारामुळे दुधलम ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पीत असल्यानं गावकऱ्यांचं म्हणणे आहे.

दुधलम गावात पाणी पुरवठ्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाची 75 हजार लिटरची पाण्याची टाकी असून पूर्ण गावातील दोन हजार लोकांना पाणी पुरवते मात्र गेल्या पाच वर्षापासून तिची साफसफाई केली नसून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याच्या टाकी मधील पाण्याचा अतिशय वाईट दुर्गंध येत असल्याने सदर बाब ग्राम पंचायत सदस्य यांनी सरपंचांच्या लक्षात आणून दिल्यावर सुद्धा सरपंचाने दुर्लक्ष केले, शेवटी कंटाळून काही गावातील तरुण टाकीवर चढल्यावर लक्षात आले की आत टाकी मधे अत्यंत विषारी मण्यार जातीचे भले मोठे दोन साप कुजलेल्या अवस्थेत पडलेले दिसले. तर गावातील तरुणांनी सदर टाकीची साफ सफाई केली असता यामध्ये दोन फुटाचा गाळ असल्याचे दिसून आले.

या अतिशय गंभीर प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले असल्याचे समजते तर काहीजण हाॅस्पीलटला सुद्धा अ‍ॅडमिट असल्याचे समजले. या घटनेसाठी गावातील सरपंच व उपसरपंच हे जबाबदार असून त्यांचा हलगर्जीपणा या निमित्ताने समोर आला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: