Monday, May 27, 2024
Homeराज्यसौ.रश्मीताई बर्वे यांनी महाविकास आघाडी तर्फे केले नामांकन दाखल...

सौ.रश्मीताई बर्वे यांनी महाविकास आघाडी तर्फे केले नामांकन दाखल…

माजी मंत्री मा. सुनिल केदार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्तिथीत.

रामटेक – राजु कापसे

रामटेक – महाराष्ट्र प्रथम चरणात होत असलेल्या लोक सभा निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना महाविकास आघाडी आणि महायुती च्या उमेदवारांनी दिनांक २७/०३/२०२४ ला माजी कँबिनेट मंत्री श्री सुनिलजी केदार, श्री राजेंद्रजी मुळक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीन काँग्रेस कमिटी, श्री रमेशजी बंग अन्य काँग्रेस च्या नेत्या सोबत सौ रश्मीताई बर्बे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज निवडणूक अधिकारी यांना सोपवीला.

या प्रसंगी बिशाँप काँटन स्कुल सदर नागपूर येथे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार साहेब), आम आदमी पार्टी व समाजवादी पार्टी महाविकास आघाडीद्वारे रामटेक मतदार संघातून महाविकास घाडीतील सर्व सन्माननीय नेतेगण कार्यकर्ते होते.

बिशाँप काँटन स्कुल सदर नागपूर इथुन रॅली चे आयोजन करण्यात आले असताना हजारो च्या संख्येने महिला, व, पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला, काँग्रेस पक्ष जिंदाबाद, रश्मीताई आगेबडो हम तुम्हारे साथ है, कहो दिलसे काँग्रेस फिरसे च्या घोषणा देत कार्यकर्ते सौ रश्मीताई बर्वे यांचा उमेदवारी अर्ज देण्यास जात असताना जनसमुदाय पहावयास मिळाले..

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments