Thursday, April 25, 2024
Homeराजकीयस्व.शिवशंकर तुरकर अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी - माजी आमदार राजेंद्रजी जैन...

स्व.शिवशंकर तुरकर अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी – माजी आमदार राजेंद्रजी जैन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

स्व. रुपचंद बहुउद्देशीय शिक्षण संस्था व विठ्ठल रुखमिणी ट्रस्ट कोरनी चे संस्थापक स्व. शिवशंकरजी रुपचंदजी तुरकर यांच्या 69 व्या जयंतीचे आयोजन राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सतोना येथे (14 मार्च) करण्यात आले. या जयंती समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, संस्था सचिव तेजकुमारी तुरकर उपस्थित होते.

शिक्षण संस्थेव्दारा स्व. शिवशंकरजी तुरकर यांच्या स्मरणार्थ प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याचे वितरण माजी आमदार राजेंद्र जैन व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी स्व. शिवशंकरजी तूरकर यांना विनम्र अभिवादन करीत म्हणाले की, गोंदिया तालुक्याच्या कोरनी ह्या एक छोट्यास्या गावात स्व. शिवशंकरजी तुरकर यांचा जन्म झाला. लहानपणात वडिलांचा छत्र हारवल्यानंतर कठिन परिस्थिती मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

त्यांना शिक्षण घेतांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्या कठीण परिस्थितीचा सामना समाजातील गोर गरीब व इतर मुलांना करावा लागू नये याकरिता त्यांनी या परिसरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

परिसरात शिक्षणाचा प्रचार प्रसार व क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरीता प्रयत्नशील राहलेले व अलौकिक व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या स्व. शिवशंकरजी तुरकर यांनी शिक्षणाच्या सोबतच धार्मिक व सामाजिक कार्यात सुध्दा आपला ठसा उमटवला.

धार्मिक कार्यात असलेल्या लगावामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेवून कोरनी घाट येथे विठ्ठल रुखमिणी ट्रस्टचे निर्माण केले. स्व. तुरकरजी आजीवन शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहिले, आज त्यांचे कार्य व स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम सुपुत्र केतन तुरकर करीत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र जैन, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, धनंजय तुरकर, डी यू रहांगडाले, किरणं पारधी, केतन तुरकर, अखिलेश सेठ, निरज उपवंशी, नेहा तुरकर, सरला चिखलोंडे, रवि पटले, नानू मुदलियार, विनित सहारे, शंकर टेभरें, दाणेश साखरे, मदन चिखलोंडे, प्रकाश पटले, शिवलाल जामरे, राजेश जमरे, जितलाल पाचे, आशिष हत्तीमारे,

पदमलाल चौरीवार, शैलेश वासनिक, सुनील पटले, विजय रहांगडाले, मदन बिसेन, नुतनलाल तुरकर, गुलाब नागरे, बाबा चौधरी, मिलिंद रामटेककर, संजय तुरकर सहित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: