Thursday, April 25, 2024
Homeराजकीयचंद्रकांत कोडवते रामटेक पं.स. चे नवनियुक्त सभापती...

चंद्रकांत कोडवते रामटेक पं.स. चे नवनियुक्त सभापती…

Share

  • रामटेक पंचायत समीतीवर भगवा झेंडा…
  • ५ – ४ ने मिळविला विजय

रामटेक – राजू कापसे

पंचायत समिती रामटेक च्या सभापती पदाची निवडणुक आज दि. १३ मार्चला दुपारी ३ ते ४ दरम्यान शांततेत पार पडली. यावेळी हात उंच करून मतदान करण्यात आले. यात शिवसेना भाजप युतीचे चंद्रकांत बजरंग कोडवते यांना ९ पैकी ५ मते पडल्याने त्यांच्यावर नवनियुक्त सभापती म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.

पंचायत समीती रामटेक येथील प्रशासकिय यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार सभापती पदासाठी दोन अर्ज आलेले होते. त्यात शिवसेना – भाजप युती चे चंद्रकांत कोडवते तर कॉग्रेस च्या अश्वीता बिरणवार यांचा समावेश होता. दुपारी ३ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली.

यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून रामटेकच्या उपाविभागीय अधिकारी ( महसुल ) वंदना सवरंगपते या उपस्थित होत्या. तसेच पंचायत समिती सदस्यांमध्ये नरेंद्र बंधाटे, चंद्रकांत कोडवते, रविंद्र कुंभरे, रामकृष्ण वरखडे, रिता कठौते, मंगला सरोते, कला ठाकरे, अश्वीता बिरणवार, पिंकी राहाटे आदी. सदस्य उपस्थित होते.

दरम्यान निवडणुक प्रक्रियेला प्रारंभ झाला. त्यात पंचायत समीतीच्या ९ सदस्यीय बॉडीमध्ये ९ पैकी ५ हात शिवसेना भाजप युतीच्या चंद्रकांत कोडवते यांच्याकडून उंच झाल्याने त्यांना विजयी घोषीत करत नवनियुक्त पंचायत समिती सभापती म्हणून घोषीत करण्यात आले.

सभापती पदाचे उमेदवार चंद्रकांत कोडवते यांना नरेंद्र बंधाटे, पिंकी राहाटे, मंगला सरोते, रिता कठौते व स्वतः चंद्रकात कोडवते असे मिळून ५ मते पडली तर सभापती पदाच्या दुसऱ्या उमेदवार अश्वीता बिरणवार यांना रविंद्र कुंभरे, कला ठाकरे, रामकृष्ण वरखडे व स्वतः अश्वीता बिरणवार असे मिळून ४ मते पडली.

दुपारी ४ वाजता दरम्यान निवडणुक प्रक्रिया संपृष्टात येताच कांद्री – सोनेघाट सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांचेसह शिवसेना तथा भाजप च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सुरुवातीला पंचायत समिती रामटेक च्या प्रांगणात व नंतर माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या कार्यालयात बॅन्ड वाजवुन व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, जी.प. सदस्य संजय झाडे, नरेंद्र बंधाटे, मांद्री ग्रा.पं. सरपंच बाल्या मासुरकर, माजी पंचायत समिती सभापती संजय नेवारे, राजेश जयस्वाल, ग्रा.पं. बोरडा ( सराखा ) चे सरपंच तुळशीदास राऊत, दाहोदा ग्रामपंचायत सरपंच आकाश वासनिक, नंदु कोहळे यांचेसह शिवसेना भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: