Sunday, April 28, 2024
Homeराज्यतब्ब्ल आठ ते नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम रेल्वे पूल...

तब्ब्ल आठ ते नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम रेल्वे पूल जनतेसाठी खुला…

Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून ऑनलाईन पद्धतीने रेल्वे मार्गावरील विविध कामांचे उदघाटन…

कल्याण (टिटवाळा) – प्रफुल्ल शेवाळे

टिटवाळा रेल्वे पूल उदघाटन बद्दल राजकीय पक्ष आणि रेल्वे प्रवासी संघटना यांच्या मधील श्रेय वादाची लढाई समोर. कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील आणि महागणपती चे स्थान असलेले टिटवाळा शहर गेल्या काही वर्षांपासून नावारूपाला येत आहे.

वाढती लोकवस्ती आणि नागरिकांची वाढती वाहने, खाजगी वाहने यामुळे मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम प्रवास हा लोकल रेल्वे फाटकमुळे अक्षरशः कंटाळावाना झाला होता.. रेल्वे फाटक हे कधीकधी 20-25मिनिट खुलं होत नसायचं.

यात रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस यांना आणि खाजगी वाहनांना सुद्धा विशेष फटका बसायचा.. अशातच गेल्या ८-९ वर्षांपासून मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम रेल्वे पुलाचे काम सुरु झाले आणि आज दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री राबसाहेब दानवे आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रेल्वे पुलाचे उदघाटन होऊन सदर पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे..

टिटवाळा येथील रेल्वे पूल उदघाटनाआधीच श्रेय वादाची लढाई समोर येताना दिसून आली आहे… यात कल्याण कसारा परिसरातील स्थानिक लोकल प्रवासी संघटना असतील..तत्कालीन मनसे पक्षाचे आमदार असतील, सध्याचे शिवसेना किंवा भाजप पक्षाचे आमदार, मंत्री महोदय तसेच पदाधिकारी असतील यांच्यामध्ये मात्र सोशल मीडिया चे माध्यम असेल किंवा बॅनरबाजी मधून सदर चा रेल्वे पूल आमच्या पाठपुराव्या मुळे झाला असल्याचे शीत युद्ध टिटवाळा परिसरात नक्कीच दिसून येत होते..

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील 21 हजार 520 कोटी रुपयांच्या 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण आज पार पडले. त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणीही करण्यात आली.

या योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकांचा समावेश असून, प्रवाशांच्या सुविधांसाठी 41 कोटी 25 लाखांची कामे केली जाणार आहेत.

पंतप्रधान श्री. मोदी जी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याण-इगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्र. 53 व क्र. 76, खडवली ते वासिंद दरम्यान अंडरपास क्र. 59 यांचे लोकार्पण, तर कल्याण-इगतपुरी मार्गावर रेल्वे उड्डाणपूल क्र. 55 व क्र. 65 यांचे भूमिपूजन केले गेले आहे..


Share
Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: